मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचं प्रतिज्ञापत्र तयार
By admin | Published: October 12, 2016 09:00 PM2016-10-12T21:00:57+5:302016-10-12T21:00:57+5:30
मराठा समाज हा सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास आहे, अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र सरकारने तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा समाज हा सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास आहे, अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र सरकारने तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. उद्या हायकोर्टात मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी होणार असून, हे प्रतिज्ञापत्र सादर केलं जाण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभर मूक मोर्चे काढले जात असतानाच त्या मोर्चांना मोठा प्रतिसादही मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रामध्ये मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे मराठा समाजाच्या लोकांसह राजकीय वर्तुळातून सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयानं आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीनंतर मराठा आरक्षणावरील सुनावणीला उच्च न्यायालयानं नकार दिला होता. त्यामुळे या याचिकेची सुनावणी दुस-या खंडपीठापुढे सुरू आहे.