कर्जमाफी न दिल्याच्या निषेधार्थ शासनाची प्रेतयात्रा
By admin | Published: March 22, 2017 07:49 PM2017-03-22T19:49:19+5:302017-03-22T19:49:19+5:30
विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पार्टीने शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती
Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 22 - विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पार्टीने शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरविला असल्याने त्याच्या निषेधार्थ शासनाची प्रेतयात्रा काढून ‘छावा’ने निषेध केला. दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजता स्टेट बँक आॅफ हैदराबादपासून शिवाजी चौकापर्यंत सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.

२०१४ च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. भाजपाचे सरकार येऊन तीन वर्षे लोटली, तरी शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा केली नाही. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफी अथवा शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केलेल्या नाहीत. शिवाय, भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकºयांच्या कर्जमाफीबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे या बँकेच्या औसा रोडवरील शाखेपासून छावा संघटनेच्यावतीने शिवाजी चौकापर्यंत सरकारच्या निषेधार्थ प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
प्रतिकात्मक प्रेतयात्रेत ‘छावा’चे विजयकुमार घाडगे-पाटील, भगवानदादा माकणे, अॅड. गणेश गोमचाळे, बाळासाहेब सपाटे, राजाभाऊ गुंजरगे, आकाश पाटील, बाळासाहेब जाधव, सोनेराव शिंदे, राहुल मुळे, मनोज फेसाटे, देवा निगुडगे, निलेश बाजुळगे, अमोल जाधव, किरण पाटील, अनिल चौधरी, सलिम शेख, विशाल पाटील, संजू राठोड आदींची उपस्थिती होती.
पोलिसांनी अंत्यसंस्काराचे साहित्य केले जप्त...
आंदोलनकर्त्यांनी ताटीवर प्रेत ठेवून त्याला चौघांनी खांदा दिला. शिकाळे धरून उलटी हलगी वाजवीत ते शिवाजी चौकापर्यंत गेले. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अंत्यसंस्काराचे साहित्य जप्त केले.