जुन्या वाहनांच्या नंबर प्लेटबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; काय खबरदारी घ्यावी लागणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 23:54 IST2024-12-27T23:52:56+5:302024-12-27T23:54:12+5:30

परिवहन विभागाकडून तीन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.

Governments important decision regarding number plates of old vehicles What precautions will need to be taken | जुन्या वाहनांच्या नंबर प्लेटबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; काय खबरदारी घ्यावी लागणार? जाणून घ्या

जुन्या वाहनांच्या नंबर प्लेटबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; काय खबरदारी घ्यावी लागणार? जाणून घ्या

सर्वोच्च न्यायालयाने  सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश दिले आहेत.  त्यानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. तसेच १ एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ही नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही.

"नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे, नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणे, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट महत्वाची आहे. तरी सर्व संबंधित वाहनमालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी," असं आवाहन करण्यात आलं आहे.

या कामासाठी परिवहन विभागाकडून तीन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होवू शकणार नाही. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता 31 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. याविषयी काही अडचण, तक्रार किंवा शंका असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर किंवा dytccomp.tpt-mh@gov.in या ईमेलवर संपर्क करावा, असं आवाहन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.

Web Title: Governments important decision regarding number plates of old vehicles What precautions will need to be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.