राज्यपाल शिवनेरीनंतर सिंहगड करणार पायी सर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 08:51 AM2021-08-13T08:51:24+5:302021-08-13T08:51:41+5:30
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते रविवारी सकाळी ९.०५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदन सोहळा होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्टला राज्यपाल किल्ले सिंहगडावर पायी जाणार आहेत.
पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते रविवारी सकाळी ९.०५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदन सोहळा होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्टला राज्यपाल किल्ले सिंहगडावर पायी जाणार आहेत.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. राज्यपालांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वयाच्या ७९ व्या वर्षी शिवनेरी पायी सर केला होता. ‘मी डोंगर चढलेला माणूस आहे. त्यामुळे गड सर करणे माझ्यासाठी कठीण काम नाही’, असे त्यावेळी त्यांनी सांगितले होते.