“केवळ नोकरीच्या मागे लागू नका, कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा”: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 09:06 PM2021-09-02T21:06:30+5:302021-09-02T21:07:31+5:30
केवळ नोकरीच्या मागे लागू नका, कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.
रत्नागिरी: आताच्या घडीला महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या वतीने विधान परिषदेसाठी १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी करण्यात आलेल्या शिफारसीवर अद्यापही निर्णय न झाल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. यातच केवळ नोकरीच्या मागे लागू नका, कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. (governor bhagat singh koshyari urged agriculture graduates make efforts for new agricultural revolution)
TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड
कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ३९ वा पदवीदान समारंभ संपन्न झाला. यावेळी कुलगुरू संजय सावंत यांच्यासह इतर मान्यवर देखील हजर होते. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली होती. पदव्युत्तर पदवीच्या १३२, पीएचडीच्या ३० आणि पदपीपूर्व अभ्यासक्रमाच्या १९२५ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यावेळी गोल्ड मेडेलिस्ट आणि पीएचडी घेणारे विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर होते. तर उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पदवी बहाल करण्यात आली.
जबरदस्त! UPI द्वारे ऑगस्टमध्ये ३.५५ अब्जांचे व्यवहार; ९.५६ टक्क्यांची वाढ PhonePe आघाडीवर
कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा
प्राचीन काळी भारत हा कृषीप्रधान देश होता. देशात दुध-दह्याच्या नद्या वाहत होत्या. कृषी व कृषीवर आधारित उद्योग, फलोत्पादन यांमुळे देश संपन्न होता. मधल्या काळात देशाने अनेक दुष्काळ पहिले परंतु त्यानंतर हरित क्रांती आली. अलीकडच्या काळात सफेत क्रांती व नील क्रांतीच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. भारत अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन व मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक शेती, पेटेंट, भौगोलिक मानांकन यांमुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालने उघडत आहेत. अशावेळी कृषी क्षेत्रातील पदवीधारकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.
TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध
दरम्यान, कृषी विद्यापीठांमध्ये नवनवे संशोधन होत असून आपण नुकतेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन पाहून आल्याचे राज्यपालांनी सांगितले. या संशोधनामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगून हे संशोधन प्रयोगशाळेतून शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.