"राज्यपाल नेमके 'त्या' राजकीय पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात की घटनेच्या हा प्रश्न पडतो!"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 06:04 PM2020-12-18T18:04:29+5:302020-12-18T18:10:28+5:30
भाजपात गेलेल्या अनेक जणांची घरवापसी होणार : नवाब मलिक
पुणे: महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने मान्य केलेली राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी जाहीर करण्यास राज्यपाल विलंब करत आहेत. ते कोणत्याही पक्षाचे नसतात. पण आधी ते कोणत्या पक्षाचे होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ते त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागतात की घटनेने दिलेल्या अधिकाराने हा प्रश्न पडतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांंनी राज्यपालांकडून होत असलेल्या विलंबाबत नाराजी व्यक्त केली.
पुण्यात एका खासगी कार्यक्रमासाठी नवाब मलिक आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी मी स्वतः, अनिल परब व अमित देशमूख यांनी राज्यपालांना दिली. त्यानंतर त्यांनी ती नावे जाहीर करायला हवी होती. पण अद्याप केलेली नाहीत. राज्यात १२आमदार काम करतील, त्यामुळे लवकर नावे जाहीर करा अशी आमची त्यांंना विनंती आहे.
भाजपात गेलेले अनेकजणांना परत यायचे आहे हे ऊपमुख्यमंत्र्यांनी सांगितले, ते खरेच आहे. भाजपाने आता त्यांचे लोक सांभाळावेत, अनेकजण संपर्कात आहेत, येत्या चार महिन्यात ही वापसी सुरू होईल.