एकनाथ खडसेंच्या ‘जनसेवेला’ राज्यपालांची ‘पोच’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 05:55 AM2020-11-26T05:55:12+5:302020-11-26T05:55:30+5:30
या पुस्तकाच्या माध्यमातून खडसे यांचे व्यक्तिमत्व, समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून केलेले योगदान यासह व्यापक सेवाकार्याचा अभ्यासपूर्ण आलेख या मांडला गेला आहे
मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करते झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जनसेवेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पोच पावती दिली आहे. त्याला निमित्त ठरले एकनाथ खडसे यांच्या वरील आलेले पुस्तक ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे’ हे डॉक्टर सुनील नेवे यांनी लिहिलेले पुस्तक.
या पुस्तकाच्या माध्यमातून खडसे यांचे व्यक्तिमत्व, समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून केलेले योगदान यासह व्यापक सेवाकार्याचा अभ्यासपूर्ण आलेख या मांडला गेला आहे असे राज्यपालांनी खडसे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि सुयश चिंतितो असेही राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी समाजकारण या क्षेत्रातून पाठवण्यात आले आहे.