राज्यपालांनी विद्यापीठांना ठणकावले!
By admin | Published: December 16, 2014 12:12 AM2014-12-16T00:12:46+5:302014-12-16T00:12:46+5:30
मागील ४-५ वर्षांपासून राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांनी त्रैमासिक लेखाजोखा राज्यपाल कार्यालयाला कळविलेला नाही. ही बाब राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या कार्यालयाने गांभीर्याने घेतली
विजय सरवदे , औरंगाबाद
मागील ४-५ वर्षांपासून राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांनी त्रैमासिक लेखाजोखा राज्यपाल कार्यालयाला कळविलेला नाही. ही बाब राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या कार्यालयाने गांभीर्याने घेतली असून, डिसेंबर अखेरपर्यंत जे विद्यापीठ त्रैमासिक अहवाल पाठविणार नाही, त्याविरुद्ध आता कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाकडून विद्यापीठांना पत्र पाठविण्यात आले असून, त्रैमासिक अहवाल सादर न करणाऱ्या विद्यापीठाला कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी समज विद्यापीठ प्रशासनाला पत्रात देण्यात आली आहे. राज्यातील विद्यापीठांचा कारभार थेट कुलपती अर्थात राज्यपालांच्या अधिपत्याखाली चालत असतो. कुलगुरूहे राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून विद्यापीठाचा दैनंदिन कारभार पाहत असतात. विद्यापीठ कायद्यानुसार राज्यपाल कार्यालयास कुलगुरूंनी दर तीन महिन्याला शैक्षणिक व प्रशासकीय अहवाल (प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट) पाठविल्यास विद्यापीठांच्या कारभाराविषयी त्यांना अपडेट राहण्यास मदत होते.