पालघरमध्ये दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 07:37 PM2017-08-15T19:37:25+5:302017-08-15T21:03:13+5:30

राज्यात दहीहंडीचा उत्सव  आज जल्लोषात साजरा होत असताना पालघरमध्ये दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. पालघर तालुक्यातीसल धनसार (काशीपाडा) येथे एका गोविंदाचा दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून पडून मृत्यू झाला आहे. 

Govinda death in Palghar | पालघरमध्ये दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू  

पालघरमध्ये दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू  

Next

पालघर, दि. 15 - राज्यात दहीहंडीचा उत्सव  आज जल्लोषात साजरा होत असताना पालघरमध्ये दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. पालघर तालुक्यातीसल धनसार (काशीपाडा) येथे एका गोविंदाचा दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून पडून मृत्यू झाला आहे. 
रोहन गोपिनाथ किणी (21) असे या मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. दहीहंडी फोडण्यासाठी वरच्या थरावर चढला असताना तो फिट येऊन खाली पडला. खाली पडल्याने मार बसून तो जबर जखमी झाला. त्यानंतर त्याला पालघर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. वरच्या थरावरून दहीहंडी फोडत असताना फिट आल्याने तो खाली पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 
 मुंबईत दहीहंडीच्या थरारात 46 गोविंदा जखमी
मुंबईमध्ये आज सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येत आहे. मात्र या थरारामध्ये उंचच उंच थर रचण्याच्या नादात अनेक गोविंदा जखमी होत आहेत. आज सकाळपासून दहीहंडीच्या थरथराटात सुमारे 46 हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी  जबर मार लागलेल्या एका गोविंदाला जबर मार लागला असून, त्याला केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.   
 संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 35 गोविंदा जखमी झाले आहेत. प्राप्त आकडेवारीनुसार मुंबईतील नायर रुग्णालयात 1, केईएम रुग्णालयात 11, सायन येथील रुग्णालयात 10, सेंट जॉर्ज रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 1, जेजे रुग्णालयात 1 माहात्मा फुले रुग्णालय, विक्रोळी येथे 1, मुलुंडच्या आग्रवाल रुग्णालयात 4, व्ही. एन. देसाई रुग्णालयात 5, कूपर रुग्णालयात 4, डॉ. आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथे 4, ट्रॉमा केअर गोरेगाव येथे 3 अशा एकूण 46  गोविंदांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केईएम रुग्णालयात एका  गोविंदाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.  

Web Title: Govinda death in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.