गोविंदाला ट्रान्झिट जामीन
By admin | Published: March 4, 2017 05:54 AM2017-03-04T05:54:18+5:302017-03-04T05:54:18+5:30
बदनामी प्रकरणी उच्च न्यायालयाने सिनेअभिनेता गोविंदाचा ट्रान्झिट जामीन मंजूर करत त्याला चार आठवड्यांचा अंतरिम दिलासाही दिला
मुंबई: बदनामी प्रकरणी उच्च न्यायालयाने सिनेअभिनेता गोविंदाचा ट्रान्झिट जामीन मंजूर करत त्याला चार आठवड्यांचा अंतरिम दिलासाही दिला. मात्र उच्च न्यायालयाने त्याला ६ मार्च रोजी झारखंडच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याचे निर्देश दिले.
न्या. साधना जाधव यांनी २५ हजार रुपयांच्या हमीवर गोविंदाचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला. तसेच त्याला चार आठवड्यांचा अंतरिम दिलासाही दिला.
त्यामुळे त्याला चार आठवडे पोलीस अटक करू शकत नाही. मात्र त्याला ६ मार्च रोजी उत्तराखंडच्या पोकुर जिल्ह्यातील मुख्य दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याचे निर्देश दिले.
२० वर्षांपूर्वी गोविंदाच्या ‘छोटे सरकार’ मधील एका गाण्यामुळे त्याच्याविरुद्ध एका वकिलाने बदनामीचा दावा केला. या दाव्यावरील सुनावणी मुख्य दंडाधिकाऱ्यांपुढे सुरू आहे.
मात्र गोविंदा सुनावणीला गैरहजर राहत असल्याने दंडाधिकाऱ्यांनी त्याला फरारी म्हणून घोषित
केले. पोलीस अटक करतील, या भीतीने गोविंदाने उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आपल्याला याविषयी काहीच माहिती नव्हती. (प्रतिनिधी)
>फरारी घोषित करू शकत नाहीत
छोटे सरकार’ नंतर अनेक चित्रपटांत काम केले
असून, समाजात वावरत असल्याने दंडाधिकारी आपल्याला ‘फरारी’ घोषित करू शकत नाहीत,
असे गोविंदाने याचिकेत म्हटले आहे.