आदर्श शिक्षकांमध्ये शासनाकडून भेदभाव

By admin | Published: February 23, 2015 03:05 AM2015-02-23T03:05:20+5:302015-02-23T03:05:20+5:30

राज्याच्या शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये शासनस्तरावर भेदभाव

Govt discrimination in ideal teachers | आदर्श शिक्षकांमध्ये शासनाकडून भेदभाव

आदर्श शिक्षकांमध्ये शासनाकडून भेदभाव

Next

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये शासनस्तरावर भेदभाव होत असल्याचे समोर आले आहे. शालेय शिक्षण विभागातील आदर्श शिक्षकांना १ लाख तर उच्च व तंत्रशिक्षण विभागातील आदर्श शिक्षकांना केवळ २५ हजारांचे पारितोषिक देण्यात येत आहे. शासनाने शिक्षकांमध्ये भेदभाव न करता सर्व आदर्श शिक्षकांना एक लाखांचे पारितोषिक द्यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गुणवंत शिक्षकांचा शालेय शिक्षण विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना १ लाखांची रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना २१ आॅक्टोबर २०१०च्या शासन निर्णयानुसार १० हजार रोख पारितोषिक देण्यात येत होते. यामध्ये बदल करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुरस्काराची रक्कम २५ हजार करण्याचा निर्णय घेतला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शिक्षकांना १ लाखाचे पारितोषिक जाहीर करावे, अशी मागणी आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे केली. (प्रतिनिधी)

Web Title: Govt discrimination in ideal teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.