एसआरए प्रकल्पांचा जीपीएस सर्व्हे

By admin | Published: September 7, 2015 01:04 AM2015-09-07T01:04:37+5:302015-09-07T01:04:37+5:30

मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे परिसरातील मंजूर झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या बाहेरील हद्दीचा जीपीएस तंत्रप्रणालीद्वारे टोपोग्रोफीकल सर्वे करण्याचा निर्णय

GPS Survey of SRA Projects | एसआरए प्रकल्पांचा जीपीएस सर्व्हे

एसआरए प्रकल्पांचा जीपीएस सर्व्हे

Next

मुंबई : मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे परिसरातील मंजूर झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या बाहेरील हद्दीचा जीपीएस तंत्रप्रणालीद्वारे टोपोग्रोफीकल सर्वे करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणाने (एसआरए) घेतला आहे. या सर्वेचे काम मे. स्टेसलाईट लिमिटेड या संस्थेस देण्यात आले आहे. यामुळे एसआरए योजना जलदगतीने मार्गी लागणार आहेत.
शहर आणि उपनगरात एसआरए योजना राबविण्यासाठी अनेक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. परंतू या योजना विविध कारणांमुळे रखडल्या आहेत. या योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी एसआरएने प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून एसआरएने मंजूरी दिलेल्या योजनांच्या बाहेरील जागांचा जीपीएस/ईटीएस या प्रभावी तंत्राद्वारे अचूक सर्वे करण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे. या यंत्रणेमुळे एसआरए योजनेचे अचूक मोजमाप घेता येणार असल्याने प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यास मदत होणार आहे.
या सर्वेमार्फत एसआरएतील झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात येणार नसून केवळ झोपडपट्टीच्या सीमांकनासाठी हा सर्वे करण्यात येणार असल्याचे, एसआरएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: GPS Survey of SRA Projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.