मदतीबाबतचा जीआर पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा - वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:07 AM2019-08-10T03:07:23+5:302019-08-10T03:07:47+5:30

मंत्री पूरग्रस्तांच्या मदतीला आले की पर्यटनाला?

GR to help salt burns on flood wounds - | मदतीबाबतचा जीआर पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा - वडेट्टीवार

मदतीबाबतचा जीआर पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा - वडेट्टीवार

Next

कºहाड (सातारा) : कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्यात सरकार अपयशी ठरले असताना दुसरीकडे दोन दिवस पाण्यात बुडालेल्यांनाच सरकारी मदत देण्याचा शासन आदेश काढून सरकारने पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मंत्री पूरग्रस्तांच्या मदतीला आले की पर्यटनाला? असा सवालही त्यांनी केला.

वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, या भागातील परिस्थिती अजूनही भीषण आहे. सरकारी यंत्रणा तोकडी पडली असून अनेक भागातील पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहचलेली नाही. मुळात ही मदत घरगुती नुकसान झालेल्यांसाठीच आहे. परंतु पुराच्या तडाख्यात छोटे व्यापारी, दुकानदार, यांचेही मोठे नुकसान झालेले आहे. त्यांच्या उदरनिवार्हाचे साधनच महापुरात उद्ध्वस्त झालेले आहे. त्यांनाही मदतीची आवश्यकता आहे. या शासन आदेशात या दुकानदारांचा व हातावर पोट असलेल्यांचा समावेश नाही. नुकसान सर्वांचेच झाले असताना मदत देताना असा भेदभाव कशासाठी? पूरग्रस्त भागाच्या पाहणीवेळी हसतमुख सेल्फी काढणारे मंत्री गिरीश महाजन यांचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. सरकारचे मंत्री पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी आले आहेत का पूरपर्यटनाला? असा सवाल त्यांनी विचारला आहे. मंत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य नसून हा लाजिरवाणा प्रकार आहे, असे ते म्हणाले.

अलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने पाणी सोडले यावरही त्यांनी शंका उपस्थित केली. पाण्याचा विसर्ग झाला असता तर सांगली भागात पाणी ओसरले असते पण या भागात तर पाण्याची पातळी वाढतच आहे. त्यामुळे पाणी सोडल्याचा दावा खोटा वाटत आहे. याप्रश्नी कर्नाटक सरकार खोटे बोलत आहे, का महाराष्ट्र सरकार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: GR to help salt burns on flood wounds -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.