दुष्काळी भागात कृपा‘वृष्टी’! कोकण, विदर्भ, मुंबई भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 10:13 AM2024-07-02T10:13:57+5:302024-07-02T10:14:25+5:30

छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरीहून ५० टक्के कमी पाऊस झाला आहे.  

Grace 'rain' in drought areas! Konkan, Vidarbha, Mumbai areas recorded below average rainfall | दुष्काळी भागात कृपा‘वृष्टी’! कोकण, विदर्भ, मुंबई भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

दुष्काळी भागात कृपा‘वृष्टी’! कोकण, विदर्भ, मुंबई भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

पुणे : राज्यात कोकण, मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ, मुंबई भागात अद्याप पावसाने ओढ दिली. ज्या भागात दुष्काळी परिस्थिती असते, त्याच ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. येत्या महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.   

सोलापूर, नगर, बीड, लातूर, धुळे, परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. हे सर्व जिल्हे दुष्काळी भागातील आहेत. यंदा कोकणात कमी पाऊस झाला आहे. त्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस होत असतो. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरीहून ५० टक्के कमी पाऊस झाला आहे.  

दुष्काळी भागात चांगला पाऊस झाला. सध्या बंगालच्या उपसागराकडून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे आताच्या हवामानात बदल हाेणार नाही. आता तरी चांगल्या पावसाची शक्यता नाही. ४-५ जुलैनंतर हवामान बदलू शकते. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

पेरण्या ५६ टक्केच ! 
राज्यात जूनमध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला असला तरी त्या तुलनेत पेरण्या केवळ ५६ टक्के झाल्या आहेत. आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ४२४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

विभागनिहाय पेरणीची टक्केवारी
कोकण    ३.९९ 
नाशिक    ४६.१०
पुणे    ७१.८७ 
कोल्हापूर    ५१.३२
छ. संभाजीनगर    १९.६५ 
लातूर    ६६.८२
अमरावती    ५२.९२ 
नागपूर    ३४.३९ 

Web Title: Grace 'rain' in drought areas! Konkan, Vidarbha, Mumbai areas recorded below average rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस