पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारी अखेर; आयोगाची तयारी, प्रारूप मतदार यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:44 PM2022-11-24T14:44:41+5:302022-11-24T14:45:41+5:30

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात नांदेड, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, लातूर, जालना जिल्ह्याचा समावेश असून त्या मतदारसंघात ५४ हजार ४१३ मतदार नोंदले आहेत.

Graduate Constituency Election in January Preparation of commission draft voter list announced | पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारी अखेर; आयोगाची तयारी, प्रारूप मतदार यादी जाहीर

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारी अखेर; आयोगाची तयारी, प्रारूप मतदार यादी जाहीर

googlenewsNext

मुंबई : पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या एकूण पाच जागांसाठी जानेवारी अखेर निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची जोरदार तयारी सुरू असून प्रारूप याद्या ही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

दर सहा वर्षांनी होणाऱ्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेले काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे आणि अमरावती मधून भाजपचे डॉ. रणजित पाटील त्याचप्रमाणे नागपूर शिक्षक मतदारसंघातून भाजप पुरस्कृत ना. गो. गाणार, औरंगाबाद मधून राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि कोकण शिक्षक मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्यासुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ७ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. या पाचही सदस्यांना मागील अधिवेशनात निरोप देण्यात आला आहे. आता या पाचही मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर होणार असल्यामुळे मतदार नोंदणी अखेरच्या टप्प्यात आली आहे. 

कुठे किती मतदार नोंदणी 
- नाशिक पदवीधर मतदारसंघात नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. या मतदारसंघात बुधवार अखेर १ लाख ५५ हजार ३२० मतदारांची नोंदणी झाली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. तेथे १ लाख २५ हजार ९२४ मतदारांची नोंदणी झाली आहे.

- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात नांदेड, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, लातूर, जालना जिल्ह्याचा समावेश असून त्या मतदारसंघात ५४ हजार ४१३ मतदार नोंदले आहेत. मागील वेळी येथे ५८ हजार ४१० मतदार नोंदवले गेले होते. नागपूर शिक्षक मतदारसंघात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. तेथे ३३ हजार ५०२ मतदारांची नोंदणी झाली आहे. मागील वेळेस ३५ हजार ९ मतांची संख्या होती. 

- कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. त्या मतदारसंघात ३० हजार १६२ मतदार नोंदणी झाली. गेल्या वेळी ३७ हजार ६०४ मतदार नोंदले होते. मतदार नोंदणीसाठी महिना शिल्लक असल्याने मतदार संख्येत भर पडेल.
 

Web Title: Graduate Constituency Election in January Preparation of commission draft voter list announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.