पदवीधर-शिक्षक मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 04:13 AM2018-05-13T04:13:08+5:302018-05-13T04:13:08+5:30
महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात द्वैवार्षिक निवडणूक घोषित करण्यात आली आहे
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात द्वैवार्षिक निवडणूक घोषित करण्यात आली आहे. नाशिक विभाग, मुंबई शिक्षक विभाग, तसेच मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रतिनिधीची मुदत ७ जुलै रोजी संपत असल्याने या मतदारसंघांत ८ जून २०१८ रोजी द्वैवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. याची मतमोजणी १२ जून रोजी होणार आहे.
डॉ. अपूर्व प्रशांत हिरे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ), कपिल पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ), डॉ. दीपक सावंत (मुंबई पदवीधर मतदारसंघ) आणि निरंजन डावखरे (कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ) यांची मुदत ७ जुुलै रोजी संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ मे असून २३ मे रोजी अर्जाची छाननी होईल. ८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि ३ शिक्षक मतदारसंघांतही निवडणूक घेतली जाणार आहे.