पदवीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणार निकालाची प्रतीक्षा
By Admin | Published: July 3, 2017 05:01 AM2017-07-03T05:01:01+5:302017-07-03T05:01:01+5:30
मुंबई विद्यापीठाने यंदापासून आॅनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणीस सुरुवात केली आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासल्यास निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाने यंदापासून आॅनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणीस सुरुवात केली आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासल्यास निकाल लवकर लागतील, हे विद्यापीठाचे म्हणणे फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. कारण पदवी अभ्यासक्रमाचे निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट बघत आहेत. एप्रिल - मे महिन्यात परीक्षा झाल्यावर, जून महिन्यात निकाल लागतील, अशी अपेक्षा होती, पण जून महिना संपून जुलै महिना सुरू झाल्यावरही निकालाचा मागमूस नाही. गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासल्या जातात.
मुंबई विद्यापीठातील निकालामध्ये नेहमीच होणाऱ्या गोंधळामुळे विद्यापीठाला टीकेचे धनी व्हावे लागते. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल प्रक्रियेत पारदर्शकता यावी, तसेच कमी वेळ लागावा, म्हणून आॅनलाइन तपासणीचा निर्णय घेण्यात आला.