ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर पोटभर धान्य !

By admin | Published: October 4, 2015 02:58 AM2015-10-04T02:58:01+5:302015-10-04T02:58:01+5:30

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर प्रत्येकी ३५ किलो धान्य व साखर देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरू असून आगामी सहा महिन्यांत ही योजना सुरू केली जाणार

Grains to the senior citizens on ration! | ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर पोटभर धान्य !

ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर पोटभर धान्य !

Next

पुणे : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर प्रत्येकी ३५ किलो धान्य व साखर देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरू असून आगामी सहा महिन्यांत ही योजना सुरू केली जाणार असल्याची घोषणा अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीष बापट यांनी शनिवारी केली.
तसेच ज्या वृद्धांना मुले
सांभाळत नाहीत, त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मानधन देण्यासाठीही शासकीय पातळीवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात मंत्री बापट बोलत होते. ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० पर्यंत आणणे, राज्याच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठांविषयीच्या सर्व योजनांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यावर आपला भर राहील.
आरोग्य आणि अन्य सुविधा सर्व ज्येष्ठ नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ज्येष्ठ नागरिक धोरणाची फेरआखणी करणार असल्याची माहिती केंद्रीय वने आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिली.

Web Title: Grains to the senior citizens on ration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.