Gram Panchayat Election Result Maharashtra: बाजी पालटली! भाजपा, शिंदे गटाकडे सर्वाधिक सरपंच पदे, ठाकरे गट पाचवर फेकला गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 12:11 PM2022-12-20T12:11:27+5:302022-12-20T12:11:57+5:30
Gram Panchayat Election Result: ग्राम पंचायतमध्ये भल्या भल्यांना सत्ता राखता आलेली नाहीय. गुजरात निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मिळालेले प्रदेशाध्यक्ष पाटील यांना त्यांची ग्राम पंचायत राखता आलेली नाही.
काही वेळापूर्वी राज्यातील ग्राम पंचायतींमधील थेट सरपंच निवडीवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस दिसत होती, परंतू आता आकडे पार पालटले आहेत. शिंदे गटाने ठाकरे गटाला खिंडीत गाठले असून ठाकरे गट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. काय आहे आकडेवारी...
ग्राम पंचायतमध्ये भल्या भल्यांना सत्ता राखता आलेली नाहीय. गुजरात निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मिळालेले प्रदेशाध्यक्ष पाटील यांना त्यांची ग्राम पंचायत राखता आलेली नाही. बाळासाहेब थोरातांच्या ग्राम पंचायतीत देखील विखे पाटलांनी सरपंच पद जिंकले आहे. यामुळे स्थानिक राजकारण जरी असले तरी धक्कादायक निकाल लागत आहेत.
भाजपा आणि शिंदे गट ५१३ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. तर मविआ ४४० ग्रा. पंचायतवर आघाडी आहे. इतरांना २१८ ग्राम पंचायती मिळत आहेत. असे असताना भाजपा ३४९, शिंदे गट १९०, ठाकरे गट १३६, राष्ट्रवादी २०६, काँग्रेस १२८ एवढ्या ग्राम पंचायतींवर आघाडीवर आहेत.
परंतू सरपंच पदासाठीचे आकडे बदलले आहेत. भाजपा - ११२, शिंदे ८४, ठाकरे - ४७, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस - ६७ व इतरांकडे ५४ सरपंचपदे गेली आहेत. भाजपाने मोठी झेप घेतली असून काँग्रेसने सरासरी कायम ठेवली आहे.