Gram Panchayat Election Result Maharashtra: ग्राम पंचायत निवडणूक: पहिला निकाल आला, मुश्रीफ गटाला जबर धक्का, भाजपाने तीन ग्रा. पं. जिंकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 08:46 AM2022-12-20T08:46:25+5:302022-12-20T08:47:38+5:30
Gram Panchayat Result: कोल्हापुर जिल्ह्यात पहिला निकाल हाती आला असून कागल तालुक्यातील हसन मुश्रीफ गटाला पहिला धक्का बसला आहे.
राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. ७४ टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली असून, सदस्यांसह थेट सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवार) लागणार आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजपा आणि शिंदे गट आघाडीवर आहे.
कोल्हापुर जिल्ह्यात पहिला निकाल हाती आला असून कागल तालुक्यातील हसन मुश्रीफ गटाला पहिला धक्का बसला आहे. बामणी ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. घाडगेंच्या राजे गटाने बाजी मारली आहे. बामणी, निढोरी आणि रणदिवेवाडी या तीनही गावात भाजपचा झेंडा फडकला आहे. कागल तालुक्यात भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे.
आतापर्यंत राज्यातील मतमोजणीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाला २५३ आणि मविआला २२७ ग्राम पंचायतींमध्ये आघाडी मिळाली आहे. यापैकी भाजपा १५०, शिंदे गटाला १०३, ठाकरे गटाला ६५, काँग्रेस ५४, राष्ट्रवादी १०८ आणि इतर १११ अशी आघाडी मिळालेली आहे. हे सुरुवातीचे कल आहेत.
यामुळे ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी शांततेत पार पडली.सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील. ग्रामपंचायतीची निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी निकालानंतर सर्वच पक्षांकडून आपला उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला जात असल्याने या दाव्यांत कुठला पक्ष प्रबळ ठरतो याकडे सर्वांचेच लक्ष आहे.