ग्रामपंचायतींसाठी धुमशान; १३ ऑक्टोबरला मतदान, १४ ला फैसला, जाणून घ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 08:12 AM2022-09-08T08:12:25+5:302022-09-08T08:12:51+5:30
उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. छाननी २८ सप्टेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत असेल.
मुंबई : राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर दिवाळीपूर्वी ऐन सणांच्या धामधुमीत राज्यात निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. छाननी २८ सप्टेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या अशी -
ठाणे : कल्याण ७, अंबरनाथ १, ठाणे ५, भिवंडी ३१, मुरबाड ३५ व शहापूर ७९
पालघर : डहाणू ६२, विक्रमगड ३६, जवाहार ४७, वसई ११, मोखाडा २२, पालघर ८३,
तलासरी ११ व वाडा ७०
रायगड : अलिबाग ३,
कर्जत २, खालापूर ४, पनवेल १, पेण १, पोलादपूर ४, महाड १, माणगाव ३ व श्रीवर्धन १
रत्नागिरी : मंडणगड २, दापोली ४, खेड ७, चिपळूण १, गुहागर ५, संगमेश्वर ३, रत्नागिरी ४, लांजा १५ व राजापूर १०
सिंधुदुर्ग : दोडामार्ग २
व देवडगड २
नाशिक : इगतपुरी ५, सुरगाणा ६१,
त्र्यंबकेश्वर ५७, पेठ ७१
नंदुरबार : अक्कलकुवा ४५, अक्राणी २५,
तळोदा ५५ व नवापूर ८१
पुणे : मुळशी १,
मावळ १
सातारा : जावळी ५,
पाटण ५ व महाबळेश्वर ६
कोल्हापूर : भुदरगड १, राधानगरी १, आजरा १
व चंदगड १
अमरावती : चिखलदरा १
वाशिम : वाशिम १
नागपूर : रामटेक ३, भिवापूर ६ व कुही ८
वर्धा : वर्धा २, आर्वी ७
चंद्रपूर : भद्रावती २,
चिमूर ४, मूल ३,
जिवती २९, कोरपना २५, राजुरा ३० ब्रह्मपुरी १
भंडारा : तुमसर १, भंडारा १६, पवनी २, साकोली १
गोंदिया : देवरी १, गोरेगाव १, गोंदिया १, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव २
गडचिरोली : चामोर्शी २, अहेरी २, धानोरा ६, भामरागड ४, देसाईगंज २, आरमोरी २, एटापल्ली २
व गडचिरोली १