ग्रा. पं. निवडणुका नव्याने जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 06:54 AM2020-11-20T06:54:02+5:302020-11-20T06:54:23+5:30

१९ जिल्ह्यांतील १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

gram panchayat election will be announced anew | ग्रा. पं. निवडणुका नव्याने जाहीर होणार

ग्रा. पं. निवडणुका नव्याने जाहीर होणार

Next

लोकमत  न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यभरातील १,५६६  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोरोनामुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी येथे केली.


 मदान यांनी सांगितले की, १९ जिल्ह्यांतील १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोरोनाची परिस्थिती उद्भवल्याने १७ मार्च २०२० रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. 

Web Title: gram panchayat election will be announced anew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.