शेतकऱ्यांना वेळेत भेटण्यासाठी कृषी सहायकांना मिळणार ग्रामपंचायतीत कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 02:16 AM2019-09-13T02:16:51+5:302019-09-13T06:46:30+5:30

ग्रामपंचायत इमारतीत जागा : ; महाराष्ट्रातील ११ हजार ५९९ जणांना लाभ

Gram Panchayat Office will get Agricultural Assistant to meet farmers in time | शेतकऱ्यांना वेळेत भेटण्यासाठी कृषी सहायकांना मिळणार ग्रामपंचायतीत कार्यालय

शेतकऱ्यांना वेळेत भेटण्यासाठी कृषी सहायकांना मिळणार ग्रामपंचायतीत कार्यालय

googlenewsNext

नितीन काळेल 

सातारा : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती आणणाºया कृषी सहायकांना आता कामकाजासाठी ग्रामपंचायतीतच किमान १५० ते २०० चौरस फूट जागा कार्यालयासाठी मिळणार आहे. त्यामुळे या कार्यालयातूनच त्यांचे कामकाज चालणार असल्याने शेतकºयांनाही वेळेत ते उपलब्ध होतील. तसेच कृषी विभागाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ११ हजार ५९९ कृषी सहायकांना कामकाजासाठी हक्काची जागा मिळणार आहे.

राज्यातील कृषी विभागात साडेअकरा हजारांहून अधिक कृषी सहायक क्षेत्रीय पातळीवर काम करत आहेत. केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजना शेतकºयांपर्यंत पोहोचविणे व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. तसेच कृषी विभागातील विविध नैसर्गिक आपत्तींचे सर्वेक्षण करणाºया समितीचे कृषी सहायक हे सदस्य आहेत. शेतकºयांच्या सहली आयोजित करणे, शेतकरी मेळावा घेणे, पीक उत्पन्नांच्या दृष्टीने शेतकºयांना मार्गदर्शन करणे अशी कामेही त्यांना करावी लागतात. तरीही अशा कृषी सहायकांना गावपातळीवर कार्यालय नव्हते. त्यामुळे कामकाज करताना अडचणी निर्माण व्हायच्या.

शेतकरी सल्ला घेण्यासाठी, अडचणी मांडण्यासाठी आल्यास कृषी सहायक कोठे सापडतील, याचा नेम नसायचा. यासाठी आता शासनानेचे कृषी सहायकांना ग्रामस्तरांवर कार्यालयीन कामकाजासाठी जागा आणि फर्निचर उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाºयांना केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कृषी आयुक्तालयांच्या अधिपत्याखालील कृषी सहायकांना ग्रामपंचायत कार्यालयात किमान १५० ते २०० चौरस फूट जागा कार्यालयीन कागदपत्रे व कामकाजासाठी तत्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. तसेच ही जागा उपलब्ध झाल्यानंतर खुर्ची, टेबल, कपाट आदींची व्यवस्था कृषी आयुक्तालयाने करावी, असे स्पष्ट केले आहे. तर कृषी सहायकांना जागा मिळाली का ? याबाबतची खात्री करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांवर देण्यात आली आहे.

यापुढे ग्रामपंचायतीतच कृषी सहायकांना कार्यालयासाठी जागा मिळणार असल्याने त्यांची उपलब्धता नेहमीच गावात राहणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकºयांना अधिक प्रमाणात होईल. तसेच शेतकºयांचे प्रश्न, अडचणी त्वरित सुटण्यास मदत होणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील सहायकांनाही कार्यालय मिळणार आहे.

कार्यालयाबाहेर माहिती...
कार्यालय झाल्यानंतर तेथे कृषी सहायकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, कामाचा दिवस आणि वेळ नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकºयांना कृषी सहायक वेळेत भेटतील. त्याचबरोबर बाहेर कोठे गेले असतील तर शेतकºयांना मोाबईलवरून माहिती घेता येणार आहे. परिणामी शेतकºयांचे हेलपाटेही टळतील. सातारा जिल्ह्यात कृषी सहायकांची ४४० पदे मंजूर असली तरी ४०४ जण कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या १४९६ आहे. या ठिकाणी कृषी सहायकांसाठी कार्यालय तयार करावे लागणार आहे. तर या सहायकांकडे पाच ते सहा गावांचा कार्यभार असतो.

यापूर्वी कृषी सहायकांना कार्यालय नव्हते; पण आता त्यांना ग्रामपंचायत इमारतीत कार्यालयासाठी जागा मिळणार आहे. त्यामुळे सहायकांना शेतकºयांचे प्रश्न, अडचणी सोडविणे सोपे होईल. तसेच कृषी सहायक कधी आणि कोणत्या वेळी गावात उपलब्ध होतील, हेही शेतकºयांना समजणार आहे. - विजयकुमार राऊत, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी

Web Title: Gram Panchayat Office will get Agricultural Assistant to meet farmers in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.