हरभरा बियाण्यांचा तुटवडा!
By Admin | Published: October 6, 2016 05:24 AM2016-10-06T05:24:28+5:302016-10-06T05:24:28+5:30
खासगी कंपन्यांनी बियाण्यांचे दर वाढविल्याने यावर्षी महाबीजकडे (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) हरभरा बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे
राजरत्न सिरसाट , अकोला
खासगी कंपन्यांनी बियाण्यांचे दर वाढविल्याने यावर्षी महाबीजकडे (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) हरभरा बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याची गरज दोन लाख क्विंटल बियाण्यांची असताना, महाबीजकडे केवळ १ लाख २० हजार क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे हरभरा बियाणे खरेदी करण्यासाठी महाबीजला तिसऱ्यांदा निविदा काढाव्या लागत आहे.
यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याने येत्या १५ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पश्चिम विदर्भाच्या पाच जिल्ह्यातील नऊ लाख हेक्टरवर रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. पण, हरभरा या रब्बीतील महत्त्वाच्या पिकाचे बियाणे महाबीजकडे उपलब्ध नाही. मागील वर्षीचा दुष्काळ आणि शेतकऱ्यांची स्थिती बघता महाबीजने १०५ रुपये प्रतिकिलो दर निश्चित केले आहेत.