राज्यात ‘महाबीज’चे ग्रामबीजोत्पादन!, शेतक-यांना अनुदान: २७ जिल्ह्यांत योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 03:50 AM2017-10-16T03:50:05+5:302017-10-16T03:50:25+5:30
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने (महाबीज) राज्यात ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत हरभरा, गहू पिकांचे राज्यस्तरावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. या योजनेत शेतकºयांना अनुदान दिले जाणार आहे.
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने (महाबीज) राज्यात ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत हरभरा, गहू पिकांचे राज्यस्तरावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. या योजनेत शेतकºयांना अनुदान दिले जाणार आहे.
राष्टÑीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान (एनएमएईटी) व बियाणे लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) या अंतर्गत हा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम येत्या वर्षात राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाच्या प्रशासकीय मान्यतेनुसार, या कार्यक्रमाची रूपरेषा महाबीजने आखली आहे. ही योजना कोकण विभाग, नागपूर विभागातील गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे सोडून उर्वरित २७ जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.
या योजनेत गाव आणि लाभार्थी शेतकºयांची निवड जिल्हास्तरावर कृषी विभागाचे संबंधित अधिकारी व महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक संयुक्तपणे करतील. या योजनेत ३५ टक्के अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ३० टक्के, या प्रमाणे लाभार्थी यादी केली जाणार आहे. निवड केलेल्या लाभार्थी शेतक-यांना एक एकर क्षेत्र मर्यादेत कडधान्य हरभरा व गळीत भुईमूग बियाणेकरिता ६० टक्के, तसेच तृण धान्य गहू पिकाकरिता ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.