अल्पावधीतच ग्रामगीता पोहोचली देश-विदेशात
By admin | Published: December 14, 2015 02:19 AM2015-12-14T02:19:08+5:302015-12-14T02:19:08+5:30
विचार साहित्य संमेलनाचा समारोपीय कार्यक्रमात वेरूळकर गुरुजींचे प्रतिपादन.
अकोला : जगातील सर्वच धर्मग्रंथांच्या तुलनेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता काही वर्षांतच देश-विदेशात पोहोचली असून, विविध भाषांमध्ये भाषांतरही झाल्याचे प्रतिपादन आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी केले. तिसर्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केवळ एक व्यक्ती नसून, ते सर्व धर्मातील संतांचे एकरूपी मिश्रण आहेत आणि त्याचेच नाव त्यांनी ह्यग्रामगीताह्ण असे दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्याप्रमाणे म्हातार्या व्यक्तीच्या खांद्यावर बसलेलं लहान मूल त्याला मार्गदर्शक ठरते, त्याचप्रमाणे ह्यग्रामगीताह्ण हे ह्यज्ञानेश्वरीह्णच्या खांद्यावर बसलेले मार्गदर्शक वाड्मय आहे. जगाच्या इतिहासात ग्रामगीता ही एकमेव आहे, जी अत्यल्प वेळेत देश-विदेशात पोहोचली आहे. येशू ख्रिस्त यांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच त्यांची समाधी उघडल्यावर ते कोणालाच दिसले नाही. अवघ्या २0 वर्षांनी भक्तांना त्यांचा प्रत्यय आला. दरम्यानच्या काळात ते कुठे होते याबाबत कोणालाच सांगता आले नाही, ते स्वामी विवेकानंदांनी सांगितले. मोहम्मद पैगंबर यांच्या कार्यकाळानंतर कित्येक वर्षांनी त्यांचे विचार जगासमोर आले. ज्ञानेश्वरांची समाधी झाल्यावर २00 वर्षांनी एकनाथ महाराजांनी त्यांच्या समाधीचे संशोधन केले आणि ज्ञानेश्वरी सर्वांसमोर आली. त्या तुलनेत ग्रामगीता ही अल्पकाळातच जगासमोर आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तुकडोजी महाराजांना जाऊन आज ४७ वर्ष झालीत, या कालावधीत त्यांचे वाड्मय देश-विदेशात गेले असून, त्याचे विविध भाषेत भाषांतर झाले. एवढय़ा अल्प कालावधीत सर्वदूर गेलेल्या राष्ट्रसंतांच्या वाङ्याला तोड नसल्याचे वेरूळकर गुरुजींनी विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात सांगितले.