Gram panchayat Election Result Live : खासदार उदयनराजेंना मोठा धक्का, दत्तक घेतलेल्या कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी फक्त 3 जागा
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 08:46 AM2021-01-18T08:46:25+5:302021-01-18T16:04:05+5:30
मुंबई - राज्यातील 15,242 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यापैकी अनेक ग्रामपंचायती बिनविरोध निकाली निघाल्या आहेत. आता, ...
मुंबई - राज्यातील 15,242 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यापैकी अनेक ग्रामपंचायती बिनविरोध निकाली निघाल्या आहेत. आता, उर्वरीत ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाला सकाळी 8.30 वाजल्यापासून सुरुवात झालीय. त्यामुळे, गावागावात उमेदवारांची आणि गावकऱ्यांची उत्कंठा वाढली असून विजयी सेलिब्रेशनसाठी गावकरी सज्ज झाले आहेत. मात्र, अनेक जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने मिरवणूक, विजयाचे सेलिब्रेशन, रॅली आणि सार्वजनिक संभांना बंदी घातली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात गावागावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
LIVE
04:04 PM
खासदार उदयनराजेंना माेठा धक्क
उदयनराजेंनी दत्तक घेतलेल्या काेंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी केवळ 3 जागा
03:58 PM
पालघर : तीन ग्रामपंचायतीवर तीन पक्ष विजयी, वसई तालुक्यातील पाली ग्रामपंचायतमध्ये ओल्गा विलास दुरुगुडे फक्त एका मताने विजयी
03:33 PM
आमदार मोनिका राजळे गटाचा दणदणीत विजय
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे आमदार मोनिका राजळे यांच्या जाऊ मोनाली राजळे यांचा गटाचा दणदणीत विजय. विरोधी अर्जुनराव राजळे यांचा पॅनल पराभूत.
02:29 PM
भादली येथील तृतीयपंथी अंजली पाटील विजयी
जळगाव : अंजली यास उमेदवारीवरून मोठा गोंधळ उडाला होता. मात्र न्यायालयाने अंजली ची उमेदवारी कायम राखली होती. अंजली पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला
02:13 PM
पाचोरा ग्रामपंचायतीत शिवसेनेचे जि. प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्या पॅनलचा धुव्वा
जळगाव : कासमपुरा ता. पाचोरा ग्रामपंचायतीत शिवसेनेचे जि. प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्या पॅनलचा धुव्वा, सर्व ९ जागा भाजपकडे.
02:08 PM
सर्वपक्षीय पॅनेलचा राष्ट्रवादीला धोबीपछाड
भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलने १७ पैकी १६ जागा जिंकत राष्ट्रवादीला दिली धोबीपछाड
01:26 PM
भाजप नेते आशिष शेलार यांनी सासुरवाडीची ग्रामपंचायत राखली
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश आहे दांडेली या गावात भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांची सासूरवाडी असून दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेने कडे होती मात्र यावेळी ती ग्रामपंचायत भाजप कडे आली आहे.भाजप नेते आशिष शेलार स्वता या ठिकाणी प्रचारासाठी आले होते.त्यामुळेच या ग्रामपंचायत वर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
01:22 PM
सुनेकडून सासू पराभूत
जळगाव : खडके खुर्द ता.एरंडोल येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सायली राजेंद्र पाटील (२०४) या सुनबाईनी त्यांच्या चुलत सासू तथा माजी सरपंच सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांना पराभूत केले. तसेच युवा सेनेचे तालुकाप्रमुख घनश्याम पाटील यांचा पराभव झाला. तर त्यांच्या पत्नी वैशाली घनश्याम पाटील (१३२) या विजयी झाल्या.
12:44 PM
तृतीयपंथीय अंजली पाटील विजयी
जळगाव - भादली, ता. जळगाव येथे महिला राखीव प्रभागातून तृतीयपंथीय अंजली पाटील विजयी.
12:23 PM
जवळा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या लक्षवेधी जवळा (ता. सांगोला) ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांचे वर्चस्व
12:19 PM
मोहितेपाटील गटाचा मोठा विजय, ग्रामपंचायतीवर कमळ खुललं
माळशिरस : भाजपकडे २६ पैकी २२ ग्रामपंचायतींवर सत्ता; विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे वर्चस्व सिद्ध
12:14 PM
वेताळे ग्रामपंचायत निवडणुकीत पती-पत्नी विजयी
खेड तालुक्यातील वेताळे येथे ग्रामपंचायत निवडणुकीत पती- पत्नी विजयी; विदयमान सरपंच बंडू बोंबले फक्त १ मताने विजयी व पत्नी सविता बंडू बोंबले ३६ मतानी विजयी.
12:08 PM
निवडणूक निकालासाठी जमलेल्या एकावर चाकूहल्ला
अकोला : ग्रामपंचायत निवडणुक निकाल ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमलेल्या गर्दीत एकावर चाकु हल्ला, हल्लेखोरास अटक
12:07 PM
वाळूंज ग्रामपंचायतीत फडकला शिवसेनेचा झेंडा
पुरंदर तालुक्यातील वाळूंज ग्रामपंचायतीत फडकला शिवसेनेचा झेंडा. सुदामराव इंगळे यांच्या पॅनेलचा दारुण पराभव. सेनेला ५ तर राष्ट्रवादीला अवघ्या २ जागा
11:58 AM
शिवसेनेच्या दिपक केसरकर यांना दे धक्का, भाजपाचा विजाय
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी कोलगाव ग्रामपंचायत भाजपने शिवसेनेकडून हिसकावून घेत माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना जोरदार धक्का दिला आहे. जिल्ह्य़ातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कोलगाव कडे पाहिले जात होते.भाजप चे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी एकहाती वर्चस्व राखले आहे.
11:55 AM
पवनारखारी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
भंडारा : तुमसर तालुक्याच्या पवनारखारी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा. नवयुवक पॅनल समर्थीत ७ उमेदवार विजयी. अपक्ष दोन व भाजपचे दोन उमेदवार विजयी.
11:48 AM
लोणी खुर्दमध्ये विखे पाटलांना दे धक्का
अहमदनगर: भाजप नेते विखे पाटील यांना धक्का; राहाता तालुक्यातील लोणी खुर्द या विखे पाटील यांच्या गावात 11जागा विरोधी पॅनलला, 6 जागा विखे पाटील गटाला
11:44 AM
जळगावातील कोथळीत खडसेंना दे धक्का, शिवसेनेचा मोठा विजय
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे गाव असलेल्या कोथळी ता.मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतीवर सहापैकी पाच जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. एकनाथ खडसे, भाजपा खासदार रक्षा खडसे यांना हा जोरदार धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे पॅनल प्रमुख पंकज राणे यांच्यासह पाच जागावर शिवसेनेचा विजय झाला आहे.
11:41 AM
नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता अनिल निधान यांच्या गटाला जबरदस्त धक्का
नागपूर : महालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस समथित गटाचे 04, भाजप 03,तर 03 अपक्ष भाजप बंडखोर विजयी झाले महालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता अनिल निधान यांच्या गटाला जबरदस्त धक्का बसला आहे
11:38 AM
ग्रामपंचायतीवर 11 पैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या
वर्धा : आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी ग्रामपंचायतीवर 11 पैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत तर दोन जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहे.
11:12 AM
माजी मंत्री राम शिंदे यांच्या चौडीतील सत्ता राष्ट्रवादीला
अहमदनगर : माजी मंत्री राम शिंदे यांच्या चौडीतील सत्ता राष्ट्रवादीला, राष्ट्रवादीला सहा, तर भाजपला तीन जागा
11:09 AM
पाचोरा येथे शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीला बहुमत
जळगाव : लोहारा ता.पाचोरा येथे १५ जागांपैकी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या अक्षय जयस्वाल यांच्या पॅनलला ९ तर पंचायत समितीच्या उपसभापती सुनीता कैलास चौधरी यांच्या भाजप पॅनलला ८ जागा.
11:09 AM
कवढेएकंदमध्ये राष्ट्रवादीचा पराभव
तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमध्ये सत्तांतर. विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादीचा पराभव. भाजप-शेकाप युतीचा विजय.
11:08 AM
साकरीतील दोन्ही उमेदवारांना एकसारखीच मतं
जळगाव : साकरी ता. भुसावळ येथील रोशन पाटील व सोपान भारंबे या प्रभाग एकमधील दोन्ही उमेदवारांना सारखीच २४७ मते.
10:52 AM
भिरवडे ग्रामपंचायतीत तिनही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी
कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. भिरवंडेत तीनही जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे सदस्य विजयी झाल्याचा पहिला निकाल आला आहे...त्यामुळे भिरवंडे गावात एकहाती शिवसेनेची सत्ता आली आहे. भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये प्रभाग एक मधून अंकिता सावंत,प्रभाग दोन मधून नितीन सखाराम सावंत, रश्मी सावंत विजयी झाले आहेत.
10:48 AM
जळगाव : निंभोरा ता. अमळनेर येथे काँग्रेसचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील यांचे पॅनल पराभूत. प्रा. सुनील पाटील यांच्या पॅनलला 9 पैकी 6 जागा.
10:45 AM
नगरदेवळ्यात भाजपाचं कमळ खुललं
पाचोरा जि.जळगाव : नगरदेवळ्यातील २५ वर्षाची शिवसेनेची सत्ता उलथून भाजप प्रणित अमोल शिंदे गटाचे वर्चस्व. १७ पैकी १० जागा भाजपकडे तर शिवसेना आघाडीकडे -७ जागा.
10:39 AM
चव्हाण-भोसलेंचं समीकरण जुळलं, 10 जागांवर विजय
सातारा : विंग येथे अतुल भोसले व पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाने एकत्र येत सत्तांतर घडवले, यांना दहा जागा. तर उंडाळकर गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले
10:38 AM
वर्ध्यातील सेलू ग्रामपंचायतीवर भाजपाचे उमेदवार विजयी
वर्धा : सेलू तालुक्यातील येळाकेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १३ पैकी १२ जागांवर भाजपा आमदार पंकज भोयर यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
10:27 AM
खर्डा ग्रामपंचायीत सत्तांतर, राष्ट्रवादीनं मारली बाजी
जामखेड (जि. अहमदनगर) तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर; राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला धोबीपछाड राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ तर भाजपचे ६ उमेदवार विजयी
10:17 AM
दक्षिण सोलापूरातील घोड तांडा ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता
सोलापूर : दक्षिण सोलापुरातील घोडा तांडा ग्रामपंचायतीमध्ये भाजपला धक्का, 9 पैकी 9 जागांवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसचे फुलसिंग लालू चव्हाण यांच्या गटाकडे सत्ता, तर विद्यमान चंद्रकांत चव्हाण यांच्या गटाचा पराभव.
09:55 AM
अक्कलोकट - मधुकर सुरवसे आणि प्रदीप जगताप यांचे पॅनल विजयी
सोलापूर : गोगाव (ता. अक्कलकोट ) येथे मधुकर सुरवसे आणि प्रदीप जगताप यांचे पॅनल विजयी, सर्वच्या सर्व सहा जागा जिंकून विजय. एक बिनविरोध
09:52 AM
नांदणीत सत्ता परिवर्तन
सोलापूर : नांदणीत सत्ता परिवर्तन, चिदानंद सुरवसे गटाला धक्का; चिदानंद सुरवसे गटाला तीन जागा तर नागण्णा बनसोडे गटाला सहा जागा मिळाल्या
09:40 AM
विजयसिंह मोहिते पाटलांचा झेंडा
माळशिरसच्या दुसऱ्या टप्प्यात विजयसिंह मोहिते पाटलांचा झेंडा, येळीव, विजयवाडी, खळवे, विठ्ठलवाडी या ग्रामपंचायतींवर विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व
09:39 AM
पोपट पवारांचा पॅनेल विजयी
हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांचं पॅनल विजयी, सातपैकी पाच जागा जिंकून विजय
09:31 AM
पृथ्वीराज चव्हाण यांना अपयश
कराड तालुक्यातील शेनोली ग्रामपंचायतीत भाजपच्या अतुल भोसले गटाला 12 जागा तर अपक्ष 1 जागा, पृथ्वीराज चव्हाण यांना अपयश
09:22 AM
हातकणंगले तालुक्यातील मिणचे ग्रामपंचायत शिवसेनेकडे तर कोपर्डे गावात सत्ताबदल
Results 2021 Live Updates | कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील मिणचे ग्रामपंचायत शिवसेनेकडे तर कोपर्डे गावात सत्ताबदल, शिवसेनेला धक्का देत काँग्रेसची बाजी, कोपर्डे ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता
09:17 AM
साताऱ्यात भाजपाने 1 आणि राष्ट्रवादीनेही 1 ग्रामपंचायत जिंकली
सातारा जिल्ह्यातील कराडमधील खुबी ग्रामपंचायत भाजपने जिंकली, खालकरवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
09:12 AM
माळशिरसमध्ये मोहिते पाटील गटाने मारली बाजी
माळशिरस तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निकालात विजयसिंह मोहिते-पाटील गटाचा विजय, तर एका ठिकाणी विजयसिंह मोहिते-पाटील आणि धवलसिंह मोहिते-पाटील दोघांच्याही समान जागा
09:03 AM
कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायत भाजपनं जिंकली
ग्रामपंचायत निवडणुकांचा पहिला निकाल हाती, कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायत भाजपनं जिंकली
09:02 AM
सोलापूर : दोन तासांत समजणार पहिला निकाल; बंदोबस्तासाठी दोन हजार 900 पोलिस तैनात
सोलापूर : दोन तासांत समजणार पहिला निकाल; बंदोबस्तासाठी दोन हजार 900 पोलिस तैनात
08:58 AM
बिनविरोध निवडणुकांमध्ये भाजपची पिछेहाट, शिवसेना एक पाऊल पुढे
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी लागणार असून गावचे कारभारी कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यातच राज्यातील बिनविरोध झालेल्या ग्रा. पं.तींची आकडेवारीही लक्षनिय आहे. बिनविरोधच्या आकडेवारीत शिवसेनेने भाजपाला मागे टाकले आहे. यामुळे आजचे सर्व ग्राम पंचायतींचे निकाल सारे चित्र स्पष्ट करणार आहेत.