ग्रामसेवकाने केला २२ लाखांचा अपहार

By admin | Published: June 9, 2017 05:04 AM2017-06-09T05:04:46+5:302017-06-09T05:04:46+5:30

पन्हाळघर खुर्द व पन्हाळघर बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये शासकीय सेवेतील ग्रामसेवक तुषार हाटकर याने शासकीय कराचा अपहार केला.

Gramsevak damages 22 lakhs | ग्रामसेवकाने केला २२ लाखांचा अपहार

ग्रामसेवकाने केला २२ लाखांचा अपहार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : पन्हाळघर खुर्द व पन्हाळघर बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये शासकीय सेवेतील ग्रामसेवक तुषार हाटकर याने शासकीय कराचा अपहार केला. २१ जून २०१४ ते २८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान त्याने ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसूल केलेली एकूण २२ लाख ४१ हजार १११ रुपये कराची रक्कम सरकारी खात्यात जमा न करता ती गायब केली. नंतर त्याचा हिशोबही दिला नाही. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

Web Title: Gramsevak damages 22 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.