भव्य जागर दिंडीने झाली मराठावाडा साहित्य संमेलनाची सुरुवात,पाच हजार विद्यार्थ्यांनी दिले विविध सामाजिक संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 01:23 PM2017-12-24T13:23:36+5:302017-12-24T13:25:44+5:30
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाड साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या 39 व्या मराठवाडा साहित्या संमेलनाची सुरुवात आज २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शिवाजी चौकात जागर दिंडीने झाली. या जागर दिंडीत विविध शाळांमधील पाच हजार विद्यार्थी-शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
अंबाजोगाई : बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाड साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या 39 व्या मराठवाडा साहित्या संमेलनाची सुरुवात आज २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शिवाजी चौकात जागर दिंडीने झाली. या जागर दिंडीत विविध शाळांमधील पाच हजार विद्यार्थी-शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठालेपाटील, सचीव दादा गोरे, उपाध्यक्ष किरण सागर, कोषाध्यक्ष भास्कर बडे,महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या उपसचीव सुवर्णा खरात, जिल्हा परीषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भारत सोनवणे, जिल्हा परीषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनोर मँडम, उपशिक्षणाधिकारी (लातुर) शशिकांत हिंगोणेकर, व्यंकटेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीचे उपाध्यक्ष तथा किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांच्या संकल्पनेतुनया जागर दिंडीत महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण देशातील शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ "अन्नदाता सुखी भव" हा संदेश या जागर दिंडीतुन देण्यात येणार आहे. या जागरदिंडीत शहरातील योगेश्वरी महाविद्यालय, खोलेश्वर महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, योगेश्वरी नुतन माध्यमिक विद्दालय, खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, व्यंकटेश माध्यमिक विद्यालय, जोधाप्रसाद माध्यमिक विद्यालय, नेताजी माध्यमिक विद्यालय, मन्सूर अली माध्यमिक विद्यालय, मिल्लिया माध्यमिक विद्यालय, डॉ. अब्दुल एकबाल माध्यमिक विद्यालय, बालनिकेतन विद्यालय, मुकुंदराज माध्यमिक विद्यालय, द्न्यानसागर गुरुकुल, जिल्हा परीषद माध्यमिक व प्राथमिक शाळा, यासह शहरातील विविध शाळांमधील हजारोंच्यावर विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या जागर दिंडीत "अन्नदाता सुखी भव" हा संदेश दिला. या दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या पासून परावृत्त करणारे, पर्यावरण रक्षण करणारे, एकात्मतेचा संदेश देणारे, सर्व धर्म समभाव चा संदेश देणारे विविध उपक्रम सादर केले.
या जागर दिंडीत व्यंकटेश विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे जवळपास पाचशे विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला असून शिवकालीन महाराष्ट्राचे दर्शन, विविध राज्यातील नागरिकांच्या वेशभूषा असलेले पथक, वैद्न्यानिक व वारकऱ्यांच्या वेशभुतील पथक, संतांच्या वेशभुतील पथक त्यांनी सादर केले.
ही जागरदिंडी साकाळी साडे आठ वाजता शिवाजी चौक येथून निघणार असून सावरकर चौक, अहिल्यादेवी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या आद्दकवी मुकुंदराज साहित्य नगरीत येवून दाखल झाली.