पहिल्या राष्ट्रीय कारा काती सामू अजिंक्यपद स्पर्धेचे शानदार उद्घाटन

By admin | Published: December 25, 2016 09:57 PM2016-12-25T21:57:02+5:302016-12-25T21:57:02+5:30

वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी सायंकाळी पहिली राष्ट्रीय कारा काती सामू अजिंक्यपद स्पर्धा-२०१६-१७ चे शानदार उद्घाटन झाले.

The grand opening of the first National Cara Kati Samu Championship | पहिल्या राष्ट्रीय कारा काती सामू अजिंक्यपद स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पहिल्या राष्ट्रीय कारा काती सामू अजिंक्यपद स्पर्धेचे शानदार उद्घाटन

Next

नीलिमा शिंगणे-जगड/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 25 - वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी सायंकाळी पहिली राष्ट्रीय कारा काती सामू अजिंक्यपद स्पर्धा-२०१६-१७ चे शानदार उद्घाटन झाले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडवित, युवतींच्या ढोल-ताशाच्या पथकाने उद्घाटन कार्यक्रमात रंगत आणली. स्पर्धेत तामिळनाडू, पॉण्डीचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्रातील एकूण १२० खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाचा समावेश शालेय खेळ स्पर्धेत नव्यानेच झाला असल्यामुळे या खेळाकडे शालेय विद्यार्थी व युवा वर्गाचा ओढा वाढला असल्याचे मत कारा-काती सामू फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष चरणजित सिंग (पंजाब) यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील लाठी काठी खेळासारखा हा क्रीडा प्रकार आहे.

Web Title: The grand opening of the first National Cara Kati Samu Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.