संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत
By admin | Published: June 17, 2017 07:48 PM2017-06-17T19:48:49+5:302017-06-17T19:48:49+5:30
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतील इनामदारवाड्यातून सकाळी प्रस्तान झाले. चिंचोली देहूरोड येथून पालखी निगडीच्या दिशेने मार्गस्त झाली.
Next
ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 17 - संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतील इनामदारवाड्यातून सकाळी प्रस्तान झाले. चिंचोली देहूरोड येथून पालखी निगडीच्या दिशेने मार्गस्त झाली. सायंकाळी पाच वाजता पालखीचे निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेतर्फे स्वागत करण्यात आले.
शहरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे टाळ मृदंगाच्या गजर करीत व तुकोंबाच्या जयघोषात निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांना ताडपत्रीची भेट देण्यात आली. दरम्यान वारकरी टाळमृदंगात तल्लीन होऊन पंढरपुरच्या दिशेने उद्या पहाटे मार्गक्रमन करणार आहेत.
पंढरीची वारी हा अवघ्या महाराष्ट्राचा आनंदसोहळा आहे. विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या या संत मांदियाळीची सेवा करण्याची संधी पालखी मार्गावरील गावांमधील भाविकांना मिळणार आहे. "साधू संत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।। या भावनेतून पिंपरी-चिंचवडकर वारकऱ्यांची सेवा करणार आहेत. यंदा पालखीबरोबर पावसाचे आगमन झाल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठलरुख्मीनी मंदीरात होणार आहे. निगडी आकुर्डीतील नागरिकांनी पालखीचे स्वागत केले.