ठाण्यात भव्य स्टेडियम

By admin | Published: August 8, 2014 12:28 AM2014-08-08T00:28:40+5:302014-08-08T00:28:40+5:30

ठाण्यातील कासारवडवली येथे आरक्षित असलेल्या 2क् एकर मैदानाच्या जागेत भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम खाजगी लोकसहभागातून (पीपीपी) बांधण्यात येणार आहे.

Grand Stadium in Thane | ठाण्यात भव्य स्टेडियम

ठाण्यात भव्य स्टेडियम

Next
>घोडबंदर : ठाण्यातील कासारवडवली येथे आरक्षित असलेल्या 2क् एकर मैदानाच्या जागेत भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम खाजगी लोकसहभागातून (पीपीपी) बांधण्यात येणार आहे. जवळपास 4क् हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये 6 हजार लोकांसाठी कन्व्हेक्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याकरिता अंदाजे 4क्क् कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या प्रकल्पाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात येईल, अशी माहिती असीम गुप्ता यांनी दिली.
हा प्रकल्प घोडबंदर रोडच्या मुख्य रस्त्यापासून नजीक व मेट्रो कारशेडपासून तीन मिनिटांच्या अंतरावर आहे. स्टेडियमच्या चहूबाजूने 3क् मीटरचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या स्टेडियममध्ये क्रिकेटसह टेबल टेनिस, बॅडमिंटन यासारखे खेळ खेळता येणार आहेत. कार्डरूम, तीन बँक्वेट हॉल, महिलांसाठी हेल्थ क्लब, फूड कोर्ट, पार्किग, फ्लोअर्स रिटेल स्टोअर्स, कार्यालये आदी सुविधा ठेवण्यात येणार आहेत. स्टेडियमशेजारी कन्व्हेक्शन ब्लॉक सुविधा ठेवण्याचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याची क्षमता महापालिकेकडे नसल्यामुळे या कामासाठी जागतिक स्तरावर निविदा काढण्यात येणार आहेत. या कामात काही टक्के महापालिकेचा सहभाग ठेवण्याचाही विचार आहे. प्रचंड प्रमाणात येणारा हा खर्च करताना व्यावसायिक नफा होण्यासाठी कन्व्हेक्शन सेंटरमध्ये पंचतारांकित हॉटेलला परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने आयुक्तांकडे केली आहे. पुढील 1क् वर्षाचा विचार करता असे मोठे प्रकल्प शहरात उभे राहायला हवेत. आपल्याकडे असणारी राखीव जागा हातची जाऊ देऊ नये म्हणून त्याचे नियोजन आतापासूनच करायला हवे, असे आयुक्तांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
 
च्मुंबईच्या सीमेवर असलेल्या ठाणो शहरात सध्या नागरीकरणाचा वेग झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुखसुविधांसाठी मोठमोठय़ा प्रकल्पांची उणीव भासू लागली आहे. 
च्भविष्याचा विचार करता पालिका प्रशासनही त्यासाठी कार्यरत झाले आहे. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम असावे, अशी संकल्पना मांडण्यात आली़ या प्रकल्पाचे सादरीकरणही गुरुवारी आयुक्तांना दाखवण्यात आले.

Web Title: Grand Stadium in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.