सभापतिपदी विशाल वाळुंज

By admin | Published: July 22, 2016 01:38 AM2016-07-22T01:38:19+5:302016-07-22T01:38:19+5:30

तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी सत्तारूढ शहर विकास समितीचे विशाल वाळुंज विजयी झाले.

Grandmother in the chair | सभापतिपदी विशाल वाळुंज

सभापतिपदी विशाल वाळुंज

Next


तळेगाव दाभाडे : तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी सत्तारूढ शहर विकास समितीचे विशाल वाळुंज विजयी झाले. शिवसेनेचे सुनील ऊर्फ मुन्ना मोरे यांचा चार मतांनी पराभव झाला. दिनेश शहा यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात
आली.
नगर परिषद सभागृहात उपसभापदी विलास टकले यांच्या अध्यक्षतेखाली सभापतिपदासाठी निवडणूक झाली. वाळुंज व मोरे यांच्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. या वेळी वाळुंज यांना अपेक्षेप्रमाणे सात, तर मोरे यांना तीन मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी विलास टकले यांनी वाळुंज निवडून आल्याचे जाहीर केले. प्रशासन अधिकारी लक्ष्मण गुळवे यांनी निवडणूक प्रक्रियेत साहाय्य केले. त्यानंतर शहर विकास समितीचे अध्यक्ष बबनराव भेगडे, नगराध्यक्षा शालिनी खळदे, ज्येष्ठ नेते मुकुंदराव खळदे, नगरसेवक गणेश काकडे, चंद्रभान खळदे, माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, मावळते सभापती दिनेश शहा आदींची अभिनंदनपर भाषणे झाली.
सत्यशीलराजे दाभाडे सरकार, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप ढमाले, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश
धोत्रे यांच्यासह शिक्षण मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती वाळुंज यांनी आभार
मानले. (वार्ताहर)
>माजी सभापती राजेंद्र दाभाडे व ब्रिजेंद्र किल्लावाला यांनी सुनील मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवडणुकीबाबत विनंती केली. मागील पाच वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येक वेळी सभापती व उपसभापतिपद बिनविरोध देऊन विरोधी पक्षाने सहकार्यच केल्याचे सुनील मोरे व सतीश राऊत यांनी सांगितले. या बदल्यात शहर विकास समितीने शेवटच्या वर्षी उपसभापतिपद विरोधी पक्षाला देण्याचा शब्द न पाळल्याने उमेदवारी मागे घेण्याबाबत सुनील मोरे , सतीश राऊत, संजय सोनवणे यांनी नकारघंटा वाजवली.

Web Title: Grandmother in the chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.