ग्रेनाईट, मार्बलच्या देवघरांना पसंती

By Admin | Published: April 26, 2016 03:23 AM2016-04-26T03:23:45+5:302016-04-26T03:23:45+5:30

काही वर्षांपूर्वी देव बसविण्यासाठी लाकडी मंदिर असायचे, शिवाय श्रीमंत व्यक्ती सागाचे किंवा इतर लाकडाचे देवघर बनवित असत.

The granite, the marble godowns are liked | ग्रेनाईट, मार्बलच्या देवघरांना पसंती

ग्रेनाईट, मार्बलच्या देवघरांना पसंती

googlenewsNext

मोहोपाडा : काही वर्षांपूर्वी देव बसविण्यासाठी लाकडी मंदिर असायचे, शिवाय श्रीमंत व्यक्ती सागाचे किंवा इतर लाकडाचे देवघर बनवित असत. शिवाय जुन्या घरांवर याअगोदर लाकडाच्याच छतावर कौले असायची. परंतु बदलत्या काळात घराचे रूपांतर बंगल्यामध्ये झाल्याने आणि घरामधील असलेले देवघर सध्या ग्रेनाईट मार्बलचे झाल्याने लाकडाची मंदिरे वापरणाऱ्याकडे नागरिकांचा कल कमी प्रमाणात झाला आहे.
सद्यस्थितीला जंगलात लागणारे वणवे, लाकूडतोड यामुळे जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. लाकडी मंदिरासाठी लागणारे लाकूड दुर्मीळ होत गेल्याने अनेकांनी मार्बल, ग्रेनाईटने सजवलेली मंदिरे घेण्याला पसंती दिली असून अशी मंदिरे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. प्रत्येकाची मानसिकता बदलत आहे. यामुळे नवीन घर बांधले गेले की त्या जागी सुंदर असे ग्रेनाईट-मार्बलचे देवघर बनविण्यासाठी लाकडी मंदिराला कमी मागणी असल्याचे दिसत आहे, मात्र यामुळे ग्रामीण भागात सुताराचे काम करणारे उत्तम कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड पडल्याचे दिसून येते. ग्रेनाईटची मंदिरे उत्तम सजवलेली असतात, त्यामुळे या मंदिरांना मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: The granite, the marble godowns are liked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.