दूध उत्पादकांना आणखी ३ महिने अनुदान- महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 01:42 AM2018-10-30T01:42:34+5:302018-10-30T01:42:52+5:30
दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे ५ रुपये अनुदान देण्याची मुदत आॅक्टोबरअखेर संपत होती.
जळगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे ५ रुपये अनुदान देण्याची मुदत आॅक्टोबरअखेर संपत होती. मात्र दुष्काळी परिस्थिती असल्याने आणखी तीन महिने अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी जळगावात आयोजित दुष्काळ आढावा बैठकीनंतर केली.
दुष्काळीस्थितीची पाहणी करण्यासाठी ते जळगाव दौºयावर आले होते. शेतांतील पिकांचीही पाहणी त्यांनी केली. अवघ्या काही मिनिटात त्यांनी आपला पाहणी दौरा आटोपला. शासनाकडून सहकारी संघ व खाजगी संघांना लिक्वीड मिल्क सेल वगळून ज्या अतिरिक्त गाईच्या दुधाचे दूध भुकटीत रूपांतर केले जाते, अशा दूधाला ५ रूपये प्रतिलिटर अनुदान दिले जाते. मात्र संघाने उत्पादकाला त्यांनी खरेदी केलेल्या संपूर्ण दुधावर २५ रु प्रतिलिटर भाव देणे बंधनकारक आहे. योजना आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१८पर्यंत कार्यरत होती.
जळगाव दूध संघाची मागणी मान्य
जळगाव जिल्हा दूध संघाने प्राथमिक दूध उत्पादक संस्थांना बँकेद्वारे पेमेंट केले असल्याने शासनाने पूर्ण अनुदान संघास अदा करावे, अशी मागणी केली. तसेच योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली. ती मागणी जानकर यांनी मान्य करीत केली.