कोकण किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी एक कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 05:38 AM2019-06-27T05:38:24+5:302019-06-27T05:38:40+5:30

कोकण किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी एक कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर झाला...

A grant of Rs 1.65 crore for tourists' safety on Konkan coast | कोकण किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी एक कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर

कोकण किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी एक कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर

Next

पालघर : जिल्ह्यातील मांडवा, एडवण, केळवा, माहिम, शिरगाव, सातपाडी, बोर्डी, घोलवड, चिंचणी, झाई-बोरीगाव, डहाणू, राजोडी, सुरुची बाग किनाºयासाठी ४१ लाख ६ हजार ५० रु पयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील मांडवा, अलिबाग, आक्षी, नागाव, मुरुड-एकदरा, मुरु ड जंजिरा, काशिद बीच, श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर, दिवेआगर व किहिम किनाºयावर सुरक्षेसाठी ७८ लाख ६ हजार १००, पालघर जिल्ह्यातील मांडवा, एडवण, केळवा आदी समुद्र किनाºयासाठी ४१ लाख ६ हजार ५० रु पयांचा निधी मंजूर केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षेसाठी तीन लाख ५९ हजार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किना-यांवर सुरक्षेसाठी ४३ लाख ८५ हजार ९५० रुपये मंजूर केले आहेत. विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर ही माहिती देण्यात आली.

Web Title: A grant of Rs 1.65 crore for tourists' safety on Konkan coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :konkanकोकण