राज्य सरकार देणार कांद्याला अनुदान; क्विंटलमागे १०० रुपये

By admin | Published: April 16, 2017 02:42 AM2017-04-16T02:42:03+5:302017-04-16T02:42:03+5:30

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत क्विंटलमागे १०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला.

Grant to the State Government onion; Quintal behind Rs 100 | राज्य सरकार देणार कांद्याला अनुदान; क्विंटलमागे १०० रुपये

राज्य सरकार देणार कांद्याला अनुदान; क्विंटलमागे १०० रुपये

Next

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत क्विंटलमागे १०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. प्रति शेतकरी जास्तीतजास्त २०० क्विंटलपर्यंत हे अनुदान देण्यात येणार आहे.
ही योजना ज्या शेतकऱ्यांनी १ जुलै २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीत बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केली आहे, त्यांच्यासाठी लागू राहील. मुंबई वगळता अन्य सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेखाली अनुदान मिळविण्यासाठी कांदा विक्री पट्टीसह, सातबाराचा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक यासह साध्या कागदावर बाजार समितीकडे कांद्याची विक्री केली असेल तेथे अर्ज करावा लागेल. परराज्यांतून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू नाही. नाशिक जिल्ह्यातील ५०२ प्रकरणांमध्ये (सातबाराचा उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मात्र मुलाच्या वा अन्य कुटुंबीयांच्या नावे आणि सातबारा उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आहे) वडील, मुलगा वा अन्य कुटुंबीयांनी सहमतीने शपथपत्र सादर करावे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Grant to the State Government onion; Quintal behind Rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.