सांगली जिल्ह्यात द्राक्षघडांची गळ
By Admin | Published: October 29, 2016 06:44 PM2016-10-29T18:44:01+5:302016-10-29T18:44:01+5:30
यावर्षी झालेल्या सततच्या हवामान बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
टाकळी, दि. २९ - यावर्षी झालेल्या सततच्या हवामान बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे. मिरज पूर्व भागातील सुमारे आठशे एकरमधील पूर्ण वाढ न झालेले द्राक्ष घड गळून पडत आहेत. त्यामुळे शेतक-यांना लाखोचे नुकसान सहन करावे लागत आहे.
एप्रिल व मे महिन्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता जास्त होती व त्यानंतर महिनाभर संततधार पाऊस झाल्यामुळे हवामानात अचानक होणाºया बदलाने खरड छाटणीनंतर द्राक्ष काडीमध्ये तयार होणाºया घडांना वाढीसाठी पोषक वातावरण मिळाले नाही. परिणामी येणारे द्राक्ष घड कुपोषित राहिले. फळ छाटणीनंतर येणाºया द्राक्ष घडांची पूर्ण वाढ न झाल्याने व कुपोषित राहिल्याने ते गळून पडत आहेत.
एका वेलीस मार्केटिंगसाठी ५० ते ५५ द्राक्ष घड ठेवले जातात, तर बेदाण्यासाठी ७० ते ८० घड ठेवले जातात. मात्र यावर्षी खरड छाटणीपासून वातावरणात सततच्या होणाºया बदलामुळे घडांची वाढ पूर्ण झाली नाही. त्यामुळे घड गळून पडत असल्याचे चित्र पूर्व भागातील सुमारे ८०० एकरामध्ये दिसत आहे.
द्राक्ष घड गळून पडत असल्याने त्याची संख्या कमी होऊन झाडास केवळ १० ते १५ घड राहात आहेत. केवळ काडी हलवली तरी घड गळून पडत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादनातही घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घड गळून पडू नयेत यासाठी शेतक-यांकडून विविध उपाययोजना व औषधांची फवारणी सुरू आहे. मात्र त्याचाही उपयोग होताना दिसत नाही. उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने व सततच्या होणा-या पावसाच्या पाण्याच्या निचºयाच्या समस्येमुळे द्राक्ष वेलीची मूळकुज झाल्याने द्राक्ष घडांचे योग्य पोषण झाले नसल्याचे टाकळीतील द्राक्ष बागायतदार संजय पाटील यांनी सांगितले. याबाबत योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
सतत अस्मानी संकटात सापडत असलेल्या द्राक्ष उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव, पाण्याची कमतरता अशा विविध संकटांत शेतकरी सापडत असतो, मात्र द्राक्ष घड गळून पडत असल्याने आणखी एका समस्येची भर पडली आहे. त्यामुळे येणाºया हंगामात द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.