लग्नमंडपात चक्क रक्तदान

By admin | Published: May 22, 2017 06:42 AM2017-05-22T06:42:14+5:302017-05-22T06:42:14+5:30

सनईचे मंगलमय सूर... फुलांनी सजलेला मंडप... पाहुण्यांची सुरू असलेली लगबग... असे वातावरण सहसा एखाद्या लग्नमंडपातच अनुभवायला मिळते. परंतु,

Great blood donation in the fair | लग्नमंडपात चक्क रक्तदान

लग्नमंडपात चक्क रक्तदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सनईचे मंगलमय सूर... फुलांनी सजलेला मंडप... पाहुण्यांची सुरू असलेली लगबग... असे वातावरण सहसा एखाद्या लग्नमंडपातच अनुभवायला मिळते. परंतु, त्याच लग्नमंडपात लगीनघाईच्या डामडौलासोबत सामाजिक बांधिलकी जपत स्वत: नवरदेव आणि लग्नासाठी आलेल्या नातेवाइकांनी चक्क रक्तदान करत आगळावेगळा उपक्रम राबवला. प्रत्यक्ष लग्नमंडपात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक पुणेकरांनी रक्तदान केले.
रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भूगाव येथील सिद्धी लॉन्स येथे अनुराज सोनवणे आणि आरती शेटे यांच्या लग्नसोहळ्यात हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या वेळी श्रीनाथ भिमाले, राजाभाऊ लायगुडे, राम बांगड, प्रसन्न
जगताप, उदय जगताप, डॉ. मधुकर साळुंके, रवींद्रनाथ आबनावे,
किशोर चव्हाण, अजय भोसले, संजय बालगुडे आदी उपस्थित होते. नवरदेवाच्या सासऱ्यांसह इतर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मिळून शिबिरात ७०हून अधिक जणांनी रक्तदान केले.
अनुराज सोनवणे म्हणाले, सध्या पुण्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून लग्नसोहळ्यास येणाऱ्या नातेवाइकांनी रक्तदान करावे, यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. व्हॉॅट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून रक्ताची चणचण किती आहे, हे आजच्या युवा पिढीपर्यंत अनेकदा पोहोचते. परंतु, ती दूर करण्यासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे.
युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Great blood donation in the fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.