महामॅरेथॉन हा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म -- विनय कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:27 PM2019-01-03T23:27:56+5:302019-01-03T23:30:34+5:30

कोल्हापुरातील पोलीस ग्राऊंडवर रविवारी (दि. ६) होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन-२’च्या नावीन्यपूर्ण उपक्रमात वारणा दूध संघ ‘प्राईड पार्टनर’ म्हणून सहभागी झाला आहे.

 The great platform for the great marathon - Vinay Kore | महामॅरेथॉन हा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म -- विनय कोरे

महामॅरेथॉन हा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म -- विनय कोरे

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापुरातील पोलीस ग्राऊंडवर रविवारी (दि. ६) होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन-२’च्या नावीन्यपूर्ण उपक्रमात वारणा दूध संघ ‘प्राईड पार्टनर’ म्हणून सहभागी झाला आहे. प्रत्येकाची प्रकृती आरोग्यदायी व सुदृढ बनली पाहिजे. त्याकरिता ‘लोकमत’ने महामॅरेथॉनच्या रूपाने एक चांगला प्लॅटफॉर्म उभारला आहे. त्यात वारणा दूध संघ दुसºयांदा सहभागी होत आहे; त्याचा मला आनंद आहे, असे मत वारणा समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले.

राज्यातील नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, पुणे या शहरांत लोकमत अभिनव उपक्रम म्हणून महामॅरेथॉन राबवीत आहे. त्यात प्रत्येक नागरिकाचे जीवन चांगले व आरोग्यदायी राहायला पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्यदायी जीवन कसे जगावे, याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास कोणाला सवड नाही, हा विचार करीत लोकमत समूहातर्फे महामॅरेथॉनच्या रूपाने चांगला उपक्रम राबविला जात आहे. त्याचा भाग म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहातर्फे विविध क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार अशा उपक्रमांतून वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात.

वर्षभरात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील मैदानी स्पर्धा खेळविल्या जातात. गेल्याच वर्षी वारणेत राष्ट्रीय स्तरावरील मुले व मुलींच्या गटाच्या शालेय स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. ‘वारणे’ची बास्केटबॉल स्पर्धा ही क्रीडा क्षेत्रात देशाच्या नकाशावर चमकली आहे. वारणा शिक्षण समूहातील अग्रेसर असलेल्या तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी, कोरे इंग्लिश अकॅडमी, वारणा विद्यालय, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, कोरे इंजिनिअरिंंग कॉलेज, कोरे फॉर्मसी कॉलेज अशा अनेक शिक्षण संस्थांनी शिक्षण, क्रीडा, आदी क्षेत्रांत वारणेचे नाव कोरलेले आहे. वारणा दूध संघाच्या वारणा श्रीखंड व दुग्धजन्य पदार्थांच्या गोडीने, तर भारतासह जगभरात ‘वारणे’चे नाव पोहोचविलेले आहे.

विशेष म्हणजे वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहातर्फे दरवर्षी सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांची जयंती ते पुण्यतिथी ‘पर्वकाल’ म्हणून साजरी केली जाते. या महिन्याभराच्या कालावधीत विविध कार्यक्रम घेतले जातात. प्रामुख्याने ‘वारणे’मध्ये दरवर्षी १३ डिसेंबरला तात्यासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त सद्भावना दौड आयोजित केली जाते. यात संपूर्ण वारणा खोºयातील कार्यकर्ते, शेतकरी सभासद उपस्थित राहतात. त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध आयोजित केले जाते. हे मैदान पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, आदी राज्यांतून कुस्तीशौकीन लाखोंच्या संख्येने कुस्त्यांचा आनंद लुटण्यासाठी येत असतात; त्यामुळे ‘वारणे’चे हे कुस्ती मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि जगविख्यात झाले आहे, याचा वारणावासीयांना आनंद आहे.
वारणेने नेहमीच प्रत्येकाच्या आरोग्यदायी व सुदृढ जीवनासाठी पावले उचलली आहेत. यापुढेही अशा उपक्रमांसाठी ‘वारणे’चे प्रयत्न सुरूच राहतील. ‘लोकमत’ने रविवारी सकाळी आयोजित केलेल्या महामॅरेथॉनमध्ये मी स्वत: सहभागी होणार आहे; तुम्हीही व्हा, असे आवाहनही डॉ. कोरे यांनी केले.

 

Web Title:  The great platform for the great marathon - Vinay Kore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.