क्रीडापटूंना मोठा दिलासा; सरावाला मैदान मोकळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 03:54 AM2020-12-18T03:54:11+5:302020-12-18T03:54:19+5:30
खो-खो, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट या खेळांसाठी मैदाने गजबजू लागणार आहेत. काही अटींचे पालन करून सरावास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई : अनलॉकचे आणखी एक दार उघडत राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काही खेळांच्या सरावांना परवानगी देत क्रीडापटूंना मोठा दिलासा दिला. मात्र खेळाच्या स्पर्धा, कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे या आदेशात स्पष्ट केले आहे.
याबाबतची नियमावली गुरुवारी जारी करण्यात आली. त्यानुसार खो-खो, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट या खेळांसाठी मैदाने गजबजू लागणार आहेत. काही अटींचे पालन करून सरावास परवानगी देण्यात आली आहे.
खेळाडू, पालक यांपैकी कोणालाही कोविडची लक्षणे दिसल्यास त्यांना सरावाच्या ठिकाणी येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सरकारने अन्य खेळांच्या सरावांनाही परवानगी दिली आहे. यामध्ये धनुर्विद्या, सायकलिंग, तलवारबाजी, शूटिंग तसेच मध्यम संपर्क असलेले क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल आणि अधिक संपर्क असणारे कराटे, कुस्ती, बॉक्सिंग, कबड्डी यांचा समावेश आहे.