४५ हजारांवर होमगार्डंना मोठा दिलासा; विनामूल्य २०-५० लाखांचं विमा कवच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 08:52 AM2022-07-04T08:52:50+5:302022-07-04T08:53:19+5:30

केंद्रीय गृहविभागाने महाराष्ट्रात ५३,८५६ होमगार्डची पदे नेमण्यास मंजुरी दिली आहे. सध्याच्या घडीला ४५ हजार जवान कार्यरत आहेत.

Great relief to 45,000 homeguards; Free insurance cover of Rs. 20-50 lakhs | ४५ हजारांवर होमगार्डंना मोठा दिलासा; विनामूल्य २०-५० लाखांचं विमा कवच 

४५ हजारांवर होमगार्डंना मोठा दिलासा; विनामूल्य २०-५० लाखांचं विमा कवच 

googlenewsNext

जमीर काझी

अलिबाग : समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांना बंदोबस्तात मोलाची साथ देणाऱ्या राज्यातील ४५ हजारांवर होमगार्डसाठी एक खुशखबर आहे. बंदोबस्ताच्या ड्यूटीवर कार्यरत असताना एखादी अघटित घटना घडल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना विम्याच्या मोबदल्यातून भक्कम अर्थसाह्य मिळणार आहे. प्रत्येक जवानाला  विनामूल्य  २० व ५० लाखांचे विमा कवच मिळणार आहे. एचडीएफसी बँकेमार्फत त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी सर्व होमगार्डचे या बँकेत खाते वर्ग करण्याचे आदेश महासमादेशकांनी सर्व जिल्हा प्रमुखांना दिले आहेत.

महत्त्वाच्या सण, निवडणुका व अन्य घटनांवेळी बंदोबस्तासाठी होमगार्डची गरज भासते. मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात आवश्यकतेनुसार त्यांना पाठवले जाते. कसल्याही विशेष सवलतीविना केवळ मानसेवी तत्त्वावर तो राबत असतो. त्यासाठी रोज ६७० रुपये भत्ता दिला जातो. मात्र, ड्यूटी बजावताना एखाद्या दुर्घटनेत ते जखमी किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्यासाठी विम्याचे कसलेही संरक्षण नव्हते. त्यामुळे जवानांकडून नाराजी व्यक्त होत होती. 

त्याची दखल घेत महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गेल्या वर्षी १३ डिसेंबरला  तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमवेत बैठक घेतली होती.  होमगार्डना विमा संरक्षण मिळवून देण्याबाबतचा प्रस्ताव बनवून त्यांना जास्तीत जास्त सवलती देण्याची तयारी दर्शविलेल्या बँकेचा प्रस्ताव बनविण्यात आला. त्यामध्ये एचडीएफसी  बँकेने विनामूल्य ही सेवा देण्याची तयारी दर्शवली. सर्व होमगार्डची खाती त्या बँकेत वर्ग करण्याच्या सूचना उपाध्याय यांनी दिल्या आहेत.

असे मिळणार विमा कवच

वैयक्तिक अपघात विमा
५० लाख (अटींशिवाय)
वैयक्तिक अपघात विमा
१० लाख (अटींसह)
कायमस्वरूपी विकलांग अपघात
५० लाख
अस्थायी आंशिक विकलांग अपघात विमा
५० लाख

बंदोबस्ताची ड्यूटी बजावीत असताना होमगार्डशी अघटित होऊ शकते. त्यामुळे त्यांना व त्यांच्या वारसांना आर्थिक साहाय्य मिळणे आवश्यक आहे. त्याबाबत राज्य सरकारच्या मान्यतेनुसार त्यांना एचडीएफसी बँकेमार्फत विनामूल्य ही सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - डॉ. भूषणकुमार उपाध्याय (महासमादेशक, होमगार्ड)

 

Web Title: Great relief to 45,000 homeguards; Free insurance cover of Rs. 20-50 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.