एलईडीमुळे मोठी ऊर्जाबचत

By admin | Published: May 1, 2016 01:59 AM2016-05-01T01:59:35+5:302016-05-01T01:59:35+5:30

परवडणाऱ्या दरात एलईडी दिव्यांचे वितरण करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उजाला उपक्रमांतर्गत राज्यात सुमारे १.६२ कोटी एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले असून, त्यामुळे दरवर्षी

Greater energy savings due to LED | एलईडीमुळे मोठी ऊर्जाबचत

एलईडीमुळे मोठी ऊर्जाबचत

Next

मुंबई : परवडणाऱ्या दरात एलईडी दिव्यांचे वितरण करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उजाला उपक्रमांतर्गत राज्यात सुमारे १.६२ कोटी एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले असून, त्यामुळे दरवर्षी १०८ कोटी युनिटची बचत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वर्षाला सुमारे १६ लाख टनाने घट होण्यास मदत होणार असतानाच ग्राहकांच्या वीज बिलात ४३० कोटी रुपयांची बचत होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०१५ मध्ये ही योजना सुरू केली. ऊर्जा मंत्रालयांतर्गत ही योजना राबवण्यात येत असून, राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणवर आहे. योजनेंतर्गत देशभरात सुमारे १० कोटीपेक्षा जास्त एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले आहे. एलईडी दिव्यांच्या वितरणामुळे राज्यात दरवर्षी १०८ कोटी युनिटची बचत होणार असून, या बचतीमुळे २८५ मेगावॅटच्या स्थापित वीजनिर्मिती क्षमतेचीही बचत होणार आहे. राज्यात ही योजना जुलै २०१५ साली राबवण्यात आली. सुमारे एका वर्षाच्या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात या योजनेंतर्गत एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात
आले आहे. पुढील सहा महिन्यांत राज्यातील प्रत्येक गावातही
एलईडी दिव्याचे वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

देशभरात दहा कोटी एलईडी दिव्यांचे वितरण करणे ही एक विक्रमी कामगिरी असून, ते ग्राहकांच्या हिताचे आहे. आपले कार्बन उत्सर्जन ३० ते ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. कार्बन उत्सर्जन आणखी कमी करण्यासाठी या वर्षी भारत सरकार आणखी २० कोटी एलईडी दिव्यांची खरेदी करणार आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री

Web Title: Greater energy savings due to LED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.