सेनेच्या टीकेमुळे महायुतीत नाराजी

By Admin | Published: September 14, 2014 02:03 AM2014-09-14T02:03:00+5:302014-09-14T02:03:00+5:30

शिवसेनेच्या मुखपत्रत भाजपा व मित्रपक्षांकडून केल्या जाणा:या जागांच्या अतिरिक्त मागणीचा खरपूस समाचार घेण्यात आला असून त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

Greater outrage against Senna's criticism | सेनेच्या टीकेमुळे महायुतीत नाराजी

सेनेच्या टीकेमुळे महायुतीत नाराजी

googlenewsNext
संदीप प्रधान - मुंबई
शिवसेनेच्या मुखपत्रत भाजपा व मित्रपक्षांकडून केल्या जाणा:या जागांच्या अतिरिक्त मागणीचा खरपूस समाचार घेण्यात आला असून त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रत म्हटले आहे की ‘जागावाटप मनासारखे झाले नाही, तर घटस्फोट घेण्याच्या तारखाही म्हणो जाहीर केल्या आहेत. हल्ली न्यायालयात घटस्फोटासाठी कोणतेही कारण चालते. पत्नीची अति ‘कामेच्छा’ हेसुद्धा घटस्फोट मिळण्याचे कारण ठरू शकते. आम्ही म्हणतो महायुतीच्या संसारात मिठाचा खडा पडू नये.’ अतिरिक्त जागांच्या मागणीची तुलना अति कामेच्छेशी करणो भाजपाला पसंत पडलेले नाही.
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्याबद्दल मुखपत्रत म्हटले आहे की, मित्रवर्य रामदास आठवले यांनी सांगितले आहे की, रिपाइंला दोन आकडी जागा मिळाल्या पाहिजेत नाहीतर आम्ही वेगळा मार्ग शोधू. आठवले हे संयमी व समंजस नेते आहेत. भीमशक्तीचा सन्मान राखण्यासाठीच आठवले यांना त्यांच्या पक्षाचा एकही 
आमदार नसताना राज्यसभेवर पाठवण्यात आले व यापुढेही भीमशक्तीचा मानसन्मान नक्कीच राखला जाईल.  
जानकर हे बारामतीच्या लढाईनंतर राज्याचे मोठे नेते झाले आहेत व त्यांचे मोठेपण दिवसेंदिवस वाढीस लागणार आहे. जानकर यांनीही जागांच्या चक्रव्यूहात न फसता काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्धच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावावी, असा अनाहूत सल्ला जानकर यांना दिला आहे. 
 
हा तर विकृत दृष्टिकोन
घटक पक्षांच्या मागण्यांकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन विकृत 
आहे. राजकीय पक्षांच्या चर्चा या राजकीय परिप्रेक्षामध्येच चालल्या पाहिजेत. त्या चर्चेला अशा पद्धतीने फाटे फोडण्याचा प्रयत्न करणो अयोग्य आहे. सभ्य शब्दांत आपण एवढेच बोलू शकतो.
                           - माधव भंडारी, 
भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते  
 
आमची ताकद आहेच
आम्ही आमचा आमदार निवडून आणू शकत नाही म्हणून शिवसेना-भाजपासोबत आलो. यापूर्वी काँग्रेसची साथ केली ती त्यामुळेच. आता आमचे आमदार निवडून येण्याची वेळ आली आहे म्हणून शिवसेना-भाजपाकडे आमची ताकद असलेल्या मतदारसंघांत जागा मागत आहोत.  
- रामदास आठवले, खासदार 
 
..हे विसरू नका
आपण शिवसेना-भाजपाकडे जास्त जागांची मागणी केलेली नाही. शिवसेनेने आपल्याला केवळ चार जागा सोडायच्या आहेत. गेली 2क् वर्षे कराड-बारामतीकरांशी दोन हात करताना नागपूरकरांशी दोस्ती केली, हा काय या जानकरचा दोष आहे का? लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती हे खरे असले तरी गोपीनाथ मुंडे आणि महादेव जानकर यांचाही थोडा वाटा आहे हे विसरू नका.   
- महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष
 
आमचा अडथळा कुठे? 
शिवसेना-भाजपा युतीत जागावाटपात समन्वय होताना दिसत नाही. ज्या जागा वर्षानुवर्षे जिंकून आणण्यात शिवसेना-भाजपाला अपयश आले त्या आपल्याकडेच राखण्याचा अट्टाहास कशाला हवा? महायुतीची एकत्र चर्चाच सुरू झालेली नाही तर अडथळा येण्याचा प्रश्न येतो कुठे? नवरा-बायको यांचे प्रेम एकतर्फी नसते तर राजकीय व्यवहारात एकतर्फी प्रेमाची अपेक्षा कशी केली जाते.    - विनायक मेटे, शिवसंग्राम

 

Web Title: Greater outrage against Senna's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.