पराभूत जागांबाबत महायुतीत फेरविचार

By Admin | Published: September 6, 2014 02:06 AM2014-09-06T02:06:25+5:302014-09-06T02:06:25+5:30

विधानसभा निवडणुकीत भाजपा 19 आणि शिवसेना 59 जागांवर सतत पराभूत होत असते, त्या जागांबाबत महायुतीत आता फेरविचार सुरू आहे

The Greatest Revision Against the Losses | पराभूत जागांबाबत महायुतीत फेरविचार

पराभूत जागांबाबत महायुतीत फेरविचार

googlenewsNext
विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण
नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजपा 19 आणि शिवसेना 59 जागांवर सतत पराभूत होत असते, त्या जागांबाबत महायुतीत आता फेरविचार सुरू असून, निवडून येण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे त्यांना या जागा दिल्या जाऊ शकतात, म्हणजे अदलाबदल होऊ शकते, असे मत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू असून, त्यामुळे अगदी युती तुटण्याच्या चर्चा आहे. नाशिक दौ:यावर आलेल्या विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना त्याचे खंडन केले. शिवसेना-भाजपामध्ये चर्चा सुरू असून, सुकाणू समितीत याबाबत निर्णय होणार आहे. तथापि, भाजपा आणि सेना यांच्याकडील ज्या जागांवर सातत्याने पराभव पत्करावा लागत आहे, अशा जागांवर विचार केला जात आहे. अशा जागांवरील उमेदवार विजयी कसे करता येतील, जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच येथे कशी संधी देता येईल याबाबत विचार केला जात आहे, असे ते म्हणाले.
या जागांमध्ये कितपत अदलाबदल होईल किंवा निश्चित आकडा किती याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. मात्र, अनेक पक्षांमधून भाजपा आणि सेनेत लोक येत असल्यामुळे त्यांचाही विचार करावा लागेल, असे सांगून तावडे म्हणाले की, स्वाभिमानी संघटना तसेच अन्य मित्र पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा झाली आहे. तसेच उमेदवारांची यादी तयार होत असून, लवकरच उमेदवार घोषित केले जातील, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: The Greatest Revision Against the Losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.