पुण्यातील ‘वन भवन’ बनणार ग्रीन बिल्डिंग

By Admin | Published: October 13, 2015 02:57 AM2015-10-13T02:57:28+5:302015-10-13T02:57:28+5:30

वन विभागाचे गोखलेनगर मध्यवर्ती कार्यालय असलेले वन भवन आता ग्रीन बिल्डिंग होणार आहे़ शासकीय इमारती बांधताना ऊर्जेचा किफायतशीर वापर करण्याचे

Green Building to become 'One Building' in Pune | पुण्यातील ‘वन भवन’ बनणार ग्रीन बिल्डिंग

पुण्यातील ‘वन भवन’ बनणार ग्रीन बिल्डिंग

googlenewsNext

विवेक भुसे, पुणे
वन विभागाचे गोखलेनगर मध्यवर्ती कार्यालय असलेले वन भवन आता ग्रीन बिल्डिंग होणार आहे़ शासकीय इमारती बांधताना ऊर्जेचा किफायतशीर वापर करण्याचे धोरण राज्य शासन लवकरच जाहीर करणार असून, त्या अगोदरच वन विभागाने हे पाऊल उचलले आहे़
तत्कालीन पर्यावरणमंत्री पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने वन भवनची उभारणी झाली़ आजूबाजूचा निसर्ग, भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असतानाही, या इमारतीतील कार्यालये ही बंदिस्त असल्याचे मुख्य उपवन संरक्षक जीतसिंग यांच्या लक्षात आले़ सूर्यप्रकाश आणि खेळती हवा यांचा वापर करून कमीत कमी विजेचा वापर करता येईल, अशा विचाराने जीतसिंग यांनी ‘सर्जन रिसर्च अ‍ॅण्ड प्लॅनिंग फाउंडेशन’ यांना ही इमारत ‘ग्रीन बिल्डिंग’ करण्यासाठी आराखडा देण्याचे काम सोपविले़ डॉ़ भानूबेन नानावटी आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने हा प्रकल्प राबविला जात आहे़

Web Title: Green Building to become 'One Building' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.