‘यशवंत’च्या जमीन विक्रीस हिरवा कंदील

By admin | Published: September 5, 2014 12:56 AM2014-09-05T00:56:26+5:302014-09-05T00:56:26+5:30

थेऊर येथील यशवंत कारखान्याची जमीन म्हाडाने खरेदी करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता देणारी सही झाल्याची माहिती कारखान्याचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितली.

Green Lantern to sell 'Yashwant' land | ‘यशवंत’च्या जमीन विक्रीस हिरवा कंदील

‘यशवंत’च्या जमीन विक्रीस हिरवा कंदील

Next
उरुळी कांचन : थेऊर येथील यशवंत कारखान्याची जमीन म्हाडाने खरेदी करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता देणारी सही झाल्याची माहिती कारखान्याचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितली. या संदर्भात मुंबईमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीच्या इतिवृत्तावर मुख्यमंत्र्यांची सही आज झाल्याने पुढील कार्यवाही होण्यास गती मिळाली.  
यशवंत कारखाना 2क्11 पासून कारखान्याच्या संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे, प्रचंड भ्रष्टाचारामुळे बंद पडला. विधानसभेची आचारसंहिता समोर दिसताना आज मुख्यमंत्र्यांनी या विषयाच्या संदर्भातील फाईलवर सही करून, जमीन विक्री करून देणी देऊन, कारखाना आहे त्याच ठिकाणी चालू करण्याच्या प्रय}ांना गती दिली. (वार्ताहर)
 
4यशवंत कारखान्यास विविध बँका, शासन, शेतकरी, कामगार व इतर वैधानिक देणी सुमारे 127 कोटींची आहेत. कारखान्याच्या सभासदांनी सर्वसाधारण सभेत सदरची रक्कम अदा करण्यासाठी सुमारे 115 एकर जमीन विक्री करून सर्व वैधानिक देणी देऊन कारखाना सुरू करण्यासाठी सहमती दिली होती. त्यानुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण मुंबई यांनी सदरची कारखान्याच्या मालकीची जमीन खरेदी करण्याचे मान्य केले आहे. जिल्हाधिकारी, पुणो यांचे आदेशान्वये सदर जमीन अधिगृहीत करण्याची कार्यवाही जून 2क्14 मध्ये सुरू झालेली आहे.

 

Web Title: Green Lantern to sell 'Yashwant' land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.