स्वच्छता उपक्रमांतून अभिवादन

By admin | Published: October 3, 2016 01:58 AM2016-10-03T01:58:49+5:302016-10-03T01:58:49+5:30

येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Greetings from cleanliness ventures | स्वच्छता उपक्रमांतून अभिवादन

स्वच्छता उपक्रमांतून अभिवादन

Next


खोर : येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच रामचंद्र चौधरी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पुरेशा लोकांची उपस्थिती नसल्याने कोरमअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली. मात्र, काही ठराविक मुद्द्यांचे या वेळी सरपंच रामचंद्र चौधरी व तलाठी रमेश कदम यांनी अहवाल वाचन केले. यामध्ये शौचालयासंदर्भामधील मुद्दा घेण्यात आला.
या वेळी गावकामगार तलाठी रमेश कदम म्हणाले, की गावामधील असलेला वाळूउपसा लवकरात लवकर बंद करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करून गाव बदनाम करण्यापर्यंत मला पोचवू नका, असे उपस्थितांना आवाहन करण्यात आले. आधारकार्ड योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा योजनांना पुनरुज्जीवित करण्याचे काम करण्यात येणार आहे. या वेळी सरपंच रामचंद्र चौधरी, तलाठी रमेश कदम, ग्रामविकास अधिकारी अशोक लोणकर, मारुती चौधरी, मधुकर चव्हाण, बाळू डोंबे, मोहन डोंबे, मारुती फडतरे, आरोग्यसेवक डी. जी. लडकत, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त जेजुरी खंडोबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या गांधीजींच्या अस्थिस्मारकास विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जेजुरी येथील खंडोबा गडाच्या पायथ्याशी पूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे अस्थिस्मारक आहे. सन १९४८ मध्ये येथील काँग्रेसचे तत्कालीन कार्यकर्ते गुंडोपंत (अण्णा) खाडे, जनार्दन बारभाई, बाबूराव नवगिरे, बाबूलाल खान व बाबूराव रत्नपारखी व इतर मान्यवरांनी बापूजींच्या अस्थी जेजुरीत आणून स्मारक उभारले होते. सुमारे २ लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेल्या स्मारकाला नगराध्यक्षा साधना दीडभाई, नगरसेविका साधना दरेकर, ज्ञानेश्वरी बारभाई, नगरसेवक जयदीप बारभाई, मुख्याधिकारी समीर भूमकर, सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, अरुणअण्णा बारभाई, सुवर्णस्टार क्लबचे अध्यक्ष रज्जाक तांबोळी, राजाभाऊ खाडे, माजी नगरसेवक मुकुंद बेलसरे, संजय इनामके, राजेंद्र बारभाई, नंदू महाजन, मनोज खोमणे, अविनाश झगडे, सर्पमित्र आयुब खान, विठ्ठल सोनवणे आदींनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले

Web Title: Greetings from cleanliness ventures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.