पंतप्रधान मोदींचे दीक्षाभूमीवर महामानवाला अभिवादन

By admin | Published: April 14, 2017 11:32 AM2017-04-14T11:32:00+5:302017-04-14T12:17:56+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. दीक्षाभूमीवर पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांना अभिवादन केलं.

Greetings to the great honor on the initiation of PM Modi | पंतप्रधान मोदींचे दीक्षाभूमीवर महामानवाला अभिवादन

पंतप्रधान मोदींचे दीक्षाभूमीवर महामानवाला अभिवादन

Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले आहे. त्यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करत महामानवाला अभिवादन केलं.  येथील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीलाही त्यांनी अभिवादन केले. 
 
यावेळी त्यांच्यासोबत  राज्यापाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवलेही उपस्थित होते. दरम्यान, दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी कोराडी येथे रवाना झालेत. तेथे नवनिर्मित वीज युनिटचे ते राष्ट्रार्पण करतील. यानंतर मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित सोहळ्यात विविध ‘भीम आधार’ योजनेसह विविध योजनांचा शुभारंभ व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
 
पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौ-याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली आहे.  
 
असा आहे पंतप्रधान मोदी यांचा नागपूर दौरा
 
- सकाळी 11.45 : कोराडी येथे औष्णिक वीज केंद्राच्या युनिटचे राष्ट्रार्पण
 
- दुपारी 12.10 : कोराडी येथून प्रस्थान
 
- दुपारी 12.25 : मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आगमन
 
- दुपारी 1.45 : मानकापूर येथून विमानतळाकडे प्रयान
 
- दुपारी 2.10 : भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीकडे होणार रवाना

Web Title: Greetings to the great honor on the initiation of PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.