वधूने रुखवतात मिळविले तयार शौचालय

By admin | Published: May 16, 2015 03:44 AM2015-05-16T03:44:10+5:302015-05-16T03:44:10+5:30

घरात शौचालय नसल्याने ग्रामीण भागातील स्त्रियांचे होणारे हाल ध्यानी घेऊन केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यासंदर्भात जोरदार मोहीम

The groom prepares to grab the toilet | वधूने रुखवतात मिळविले तयार शौचालय

वधूने रुखवतात मिळविले तयार शौचालय

Next

राजेश्वर वैराळे, बोरगाव वैराळे
घरात शौचालय नसल्याने ग्रामीण भागातील स्त्रियांचे होणारे हाल ध्यानी घेऊन केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यासंदर्भात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. हीच जागरूकता दाखवत अकोला जिल्ह्यात एका नववधूने रुखवतात तयार शौचालय मिळविले. तिच्या या आग्रही भूमिकेमुळे विवाहसोहळ्यातच तिचा सत्कार करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्याच्या मोझर येथील कृष्णकुमार माकोडे याच्याशी चंदा उर्फ चैताली दिलीप गाळखे (राठोड) हिचा विवाह ठरला; मात्र सासरी शौचालय नसल्याचे तिला समजले. माहेरी शौचालय असल्याने तिने सासरीही शौचालय असावे, असा निर्धारच केला. तिने कुटुंबीय आणि नातेवाइकांकडे रुखवतात तयार शौचालय (रेडिमेड) मिळावे, यासाठी आग्रह धरला. तिच्या या आग्रहाचे कुटुंबीय आणि इतर नातेवाइकांनी कौतुक करीत तिला तयार शौचालय देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी बाळापूूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) येथे पार पडलेल्या तिच्या विवाह सोहळ्यात तिचे मामा गजानन नाडे यांनी तिला रेडिमेड शौचालय रुखवतात दिले. विवाहितेच्या या आग्रही भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून, ग्रामीण भागात अशा प्रकारचा आग्रह करणे तसेच याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.

Web Title: The groom prepares to grab the toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.